सेंटर फॉर डेवलपमेंट रिसर्च आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची संयुक्त कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न

नागपूर :- सेंटर फॉर डेवलपमेंट रिसर्च आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज एका दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा विषय “कायदा आणि मानव संसाधन विकास: बदलत्या जगात संधी आणि आव्हाने” होता.

कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेत कंपनी सचिव दीप्ती जोशी यांनी “कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013” या विषयावर व्याख्यान दिले. यात त्यांनी कायद्याची तरतूद, त्याचे महत्त्व, अंमलबजावणी आणि त्याचे पालन करण्याबाबत माहिती दिली. तर, कंपनी सचिव शंतनू जोग यांनी “मानव संसाधनातील कायदेशीर व्यावसायिकांची भूमिका” या विषयावर व्याख्यान दिले. यात त्यांनी वकिली आणि सल्लागार क्षेत्रातील आपल्या अनुभवांवर आधारित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इंडोरामाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन-औद्योगिक संबंध) आणि औद्योगिक संबंध क्षेत्रातील तज्ञ डॉ. सुरेश पंदिलवार यांनी “औद्योगिक संबंधांमधील आव्हाने” या विषयावर व्याख्यान दिले. यात त्यांनी बदलत्या जगात औद्योगिक संबंधांमध्ये येणाऱ्या विविध आव्हानांवर प्रकाश टाकला. या कार्यशाळेची माहिती सेंटर फॉर डेवलपमेंट रिसर्चचे अध्यक्ष व केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे सल्लागार डॉ. कपील चांद्रायण यांनी विद्यार्थ्यांना सेंटर फॉर डेवलपमेंट रिसर्च बद्दल माहिती देतांना विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या अनेक संधीं बद्दल अवगत केले. डॉ. अविनाश आचार्य, वरिष्ठ व्यवस्थापक (मास – विधी), महावितरण यांनी परिसंवादाचे प्रास्ताविक भाषण केले आणि कार्यशाळेतील तीन विषयांची विस्तृत माहिती देतांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

या कार्यशाळेला कुलसचिव डॉ. आशिष दीक्षित, प्राध्यापक डॉ. मुक्ताई चव्हाण देब, डॉ. रमण तिरपुडे आणि डॉ. सुशांत वाघमारे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरली. यातून विद्यार्थ्यांना कायदा आणि मानव संसाधन विकास या क्षेत्रातील विविध पैलूंबद्दल माहिती मिळाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजधानीत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी 

Tue Mar 12 , 2024
नवी दिल्ली :- संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज दोन्ही महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.             कॉपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस तसेच, कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com