फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :-दिनांक २२.०५.२०२३ मे १२.४५ वा. ते दि. २३.०५.२०२३ चे १७.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत अवस्थी नगर, प्लॉट नं. २३, नागपूर येथे राहणान्या फिर्यादी मुनिया अलम वय ३३ वर्ष या घरी हजर असतांना आरोपी मो.क्र. ९६९८५५०००४ चा धारक याने फिर्यादीस फोन करून तुमचे पेडेक्सने पार्सल मुंबई वरून तायवान ला जात असून ते कस्टम विभागाने थांबविले आहे असा फोन केला. फिर्यादीने त्यांना मी कोणतेही पार्सल आर्डर केले नाही असे म्हटले असता, आरोपीने फिर्यादीस कस्टम विभागाचे सिनियर अधिकारी अजय सिंग यांचे सोबत बोलण्यास सांगीतले आरोपिनी संगणमत करून फिर्यादीस स्काईप आयडी वरून राजमुद्रा तसेच मुंबई क्राईम ब्राँच सी बी. आय. असे लिहीलेले कागदपत्रे दाखविले व त्यावर ईंडी चा लोगो असल्याचे दाखवून फिर्यादीस भिती दाखवून फिर्यादीचे वेगवेगळ्या बँकेचे खात्यातून एकूण ४,८२,७७८/- रु. ऑनलाईन वळते करून फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलीस ठाणे सायबर येथे आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२० २४६५. ४६७. ४६८, ४७१,३४ भा.दं.वि. सहकलम ६६ (सि) ६६ (डी) माहीती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सपोनि बागुल पोलीस ठाणे सायबर हे करीत आहे.

NewsToday24x7

Next Post

आनंद नगरात स्पिड ब्रेकर लावा, नागरी सुविधा समिति चे मुख्याधिकाऱ्याना निवेदन

Wed May 24 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधितुन आनंद नगर रामगढ भागात प्रशस्त सिमेंट रोड बांधण्यात आले असून सुसाट धावणाऱ्या वाहनांना आळा घालण्या साठी पाच ठिकाणी गतिरोधक लावण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन नागरी सुविधा समिति चे अध्यक्ष उज्वल रायबोले यांनी आज दुपारी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना सोपविले. आनंद नगर येथे तीन आरा मशीन आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com