घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत एलॉट नं. ९२. माऊली नगर, उत्कर्ष सोसायटी, पिपळा फाटा रोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी शुभम वसंतराव बव्हाण, वय २९ वर्षे हे आपले घराला कुलूप लावून बाहेर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने फिर्यादीचे घराचे मुख्यदाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतुन रोख ४०,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १,८०,०००/-रु. या मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ४५४, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल होता.

गुन्हयाचे तपासात हुडकेश्वर पोलीसांनी तांत्रीक तपास करून तसेच, मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन गुन्हयातील आरोपी १) बादल संजय संतापे, वय २४ वर्षे, रा. शामनगर, रमाई बुध्दविहार जवळ, नविन कामठी २) आकाश उर्फ साठा राष्ट्रपाल देशपांडे, वय २५ वर्षे, रा. आंबेडकर नगर, बुध्दविहार जवळ, कळमना रोड, नागपुर ३) निखील संतोष गजभिये, वय २६ वर्षे, रा. जयभिम चौक, कळमना रोड, नविन कामठी, नागपुर ४) सतिष रामेश्वर शेंडे, वय ३६ वर्षे, रा. स्वामी विवेकानंद नगर, कन्हान, जि नागपुर यांना ताब्यात घेवुन, त्यांची सखोल विचारपुस केली असता, आरोपींनी पल्सर मोटासायकल क. एम.एन. ४० बि. क्यु ५३९७ या वाहनाने येवुन घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी ३५ ग्रॅम सोन्याचा रवा, व मोटारसायकल क. एम.एच. ४० वि. क्यु ५३९७ किंमती ५०,०००/- रू. असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त परी क. ४. सपोआ अजनी विभाग व वपोनि देशमाने यांचे मार्गदर्शनात, पोउपनि पांडे, गुडेकर, पोहवा, मनोज नेवारे, सोनटक्के, वैद्य, इंगळे, नापोअ पाटील, सिन्हा, मडावी, पोज हिमांशु, मपोडवा. शारदा मेरे व मपोळं ममता यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस अटक

Thu Feb 22 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन फिर्यादी मुलगी हिची ओळख आरोपी नामे शाम उर्फ बिटु प्रशांत बेलखोडे, वय २४ वर्षे, रा. जय जलाराम नगर, खरबी रोड, वाठोडा याचे सोबत झाली. दिनांक १९:०१ २०२४ रोजी २०.०० वा. ये सुमारास यातील आरोपीने फिर्यादीचे अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन तिला हसनबाग येथे पाणिपुरी खाण्याचे बहाण्याने बोलाविले आरोपीने फिर्यादीला तेथुन त्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com