संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आर्थिक वर्ष 31 मार्च अखेरला संपणार आहे त्यामुळे मार्च अखेरपर्यंत कर वसुली करण्याची कामठी नगर परिषदची लगबग सुरू आहे.तर मार्च अखेर पर्यंत कर वसुलीत गुंतलेले नगर परिषद कर्मचाऱ्यांना दिलेली नवीन आयडब्लूबीपी सॉफ्टवेअर यंत्रणा सोयीचे ठरत असून कामे करताना प्रशासनाला समाधान प्राप्त होत आहे.तर आर्थिक वर्षातील कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला सोयीचे होत आहे.
कामठी नगर परिषद चा कारभार हा पारदर्शक व्हावा यासाठी ई सर्व्हीस सुविधा शासनाने सुरू केले त्यानुसार एसीएम सॉफ्टवेअर यंत्रणा वापरली जात होती त्यामुळे नगर परिषद चे कामे सोपे झाले होते. मात्र शासनाने आयडब्लूबीपी ही नवीन यंत्रणा तयार करून त्याद्वारे कर प्रणालीसह इतर सुविधा त्याद्वारे सुरू केल्या.या नव्या यंत्रणेत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने नगर परिषद ला कर वसुलीची कामे करत असताना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ही यंत्रणा कुचकामी ठरल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ही नवीन यंत्रणा आता सुरळीत सुरू असल्याने नगर परिषद प्रशासनाला कामे करणे सोयीचे ठरत आहे.
2023-24 आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस उरले असताना नागरिकांकडून कर वसुली करण्याची मोहीम गतिशील आहे.कर वसुलीसाठी आयडब्लूबीपी हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.त्यानुसार कामे सुरू असल्याने कर्मचाऱ्यात समाधान पावले जात असले तरी कधीकाळी ही यंत्रणा वापरताना कर पावती न निघणे,माहिती भरताना वेळ लागणे,माहिती अपडेट न होणे यासह विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास ही यंत्रणा कुचकामी ठरल्याचेही बोलण्यात येते.