संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा “निर्धार महिला पुरस्कार २०२५” ने सन्मानित करण्यात येईल
कामठी :- दरवर्षी जागतिक महीला दिना निमीत्य “निर्धार व महीला बाल कल्याण समीती,नागपुर तर्फे विविध क्षेत्रात उललेख्यनिय कार्य करणा-या महीलांचा निर्धार पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
जागतिक महिला दिनानिमित्त “निर्धार” महिला व बाल विकास समितीतर्फे दि. ८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता. ड्रॅगन पॅलेस कॅम्पस, दादासाहेब कुंभारे परिसरातील एम.टी डी सी. सभागृह* येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलाला *”निर्धार महिला पुरस्कार २०२५” प्रदान करून सम्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी “निर्धार” महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या माजी सदस्या व महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री, मा. ॲड. सुलेखा कुंभारे राहणार आहेत. पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांच्या शुभ हस्ते “निर्धार महिला पुरस्कार २०२५” या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाला ज्योती चंद्रशेखर बावनकुळे, स्नेहलता दाते, रोशनी सिध्दार्थ गायकवाड, डॉ अफरोज हनिफ शेख, विद्या भिमटे, प्रेमलता दिदी प्रामुख्याने उपस्थित सहुल मार्गदशन करणार आहेत.
“निर्धार महिला पुरस्कार २०२५”* या कार्यक्रमाकरीता विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या महीलांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या नंदनी पिंपलापुरे, राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या माजी महापौर अर्चना डेहनकर, साहित्तीक क्षेत्रात उललेखनिय कार्य करणा-या मालती साखरे. शैक्षणीक क्षेत्र उल्लेखनिय कार्य करणा-या डॉ नुसरत मिन्नो किडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या रहनुमा आलम, उद्योग क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या रिथा जैन तसेच वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या मा डॉ शिल्पी जोहरे, इत्यादिचा “निर्धार महिला पुरस्कार २०२५ प्रदान करून सत्कार करण्यात येणार आहे
या प्रसंगी “या पाखरांनो या परतून या” हे पथ नाटय कामठी महिला संघ द्वारे प्रस्तुत करण्यात येईल
“सुरक्षित नारी सुरक्षित भारत”चा देखील संकल्प केलेला आहे.