औषध निर्मिती क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी – केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी

– निकिता फार्मा कंपनीचे उद्घाटन

नागपूर :- औषध निर्मितीचे क्षेत्र व्यापक असून भविष्यात त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तारच होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्याही भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केला. बुटीबोरी येथील निकिता फार्मा कंपनीचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार समीर मेघे, माजी खासदार अजय संचेती,  रवलीन सिंग खुराणा यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत पीएलआय योजनेमध्ये निकिता फार्मा कंपनी पात्र ठरल्याबद्दल ना.  गडकरी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ‘कंपनीतील उत्पादनांची निर्यात ही व्यवसायाच्या आणि आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. भविष्यात निकिता फार्मा निर्यातीच्या क्षेत्रातही स्वतःला सिद्ध करेल. यासोबतच येत्या पाच वर्षांत रोजगाराच्या मोठ्या संधी स्थानिकांसाठी उपलब्ध करून देईल,’ असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

NewsToday24x7

Next Post

‘क्रांतीगाथा’ उपक्रमातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा - केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी 

Mon Sep 18 , 2023
– संस्कार भारतीच्या नाट्य महोत्सवाचा समारोप नागपूर :- वर्तमानात इतिहासाचे चिंतन केले तर भविष्याची प्रेरणा मिळत असते. क्रांतीगाथा या नाट्य महोत्सवातून नव्या पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. संस्कार भारती आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य सुरेश भट सभागृहात […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com