इंदर खुली कोळसा खदान येथुन दोन ट्रक मध्ये ५० टन कोळसा चोरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस ६ कि मी अंतरावर इंदर काॅलरी खोल खुली खदान मधुन कोणी तरी चोराने दोन ट्रक मध्ये ५० टन कोळसा भरून चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला वेकोलि सुरक्षा अधिकारी यांचा तक्रारीने कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.१७) मे ते बुधवार (दि.१८) मे पर्यंत अमित मिश्रा व राहुल मिश्रा यांची ड्युटी असतांना १८ मे चे सकाळी ४ वाजता दरम्यान अमित मिश्रा ने वेकोलि सुरक्षा अधिकारी रविदास रामदास कंडे वय ४४ वर्ष राह. चनकापुर काॅलोनी २६/१ खापरखेड़ा याना फोन करून माहिती दिली कि, इंदर काॅलरी खोल खुली खदान चे कोळसा डेपो मधुन अज्ञात वाहन चालकाने दोन ट्रक कोळसा अंदाजे ५० टन कोळसा किंमत १,२४,२०० रुपये चा मुद्देमाल भरून चोरी करून चालक मालक गोंडेगाव ओवर डम्पिंग रोड वरून जुनीकामठी कडुन पळुन गेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी सुरक्षा अधिकारी रविदास कंडे यांच्या तक्रारीने व पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या आदेशाने आरोपी विरुद्ध अप क्र. ३००/२०२२ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com