संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील काही महिन्यांपासून अनेक तरुणी व महिलांना काल्पनिक सुख ,सुविधांसह विविध आमिषे दाखवीत त्यांना फूस लावून पळवून नेण्यात येत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत तर पोलीस स्टेशन ला यासंदर्भात मिसिंगचे बरेच प्रकरणं दाखल आहेत.
21 व्या शतकातही अनेक सुशिक्षित तरुणी व महिला अशा आमिष दाखविणाऱ्यांच्या जाळ्यात अडकत असून असे घडणारे प्रकार रोखण्यासाठी आता समाजातून जनजागृती अभियान राबवित सामाजिक ,पारिवारिक व वयक्तिक स्तरावर याबाबत विविध उपाययोजना राबवून याला आळा घालने गरजेचे झाले आहे.
महिला वर्ग हा आजच्या काळात सर्वच क्षेत्रात आपले पाय रोवत असल्याचे आपण सर्वत्र पाहतो परंतु महिला व युवतींची फसवणूक झाल्याच्या घटनामध्ये गेल्या काही वर्षात वाढही तेवढीच झाली आहे. मात्र काही समाजकंटक केवळ आपल्या स्वार्थापोटी तरुणी व महिलांना संकटाच्या दरीत लोटल्या जात असल्याचे विदारक चित्र आज समाजाला पाहायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षात वाढलेले हे प्रकार थांबविण्यासाठी आता चळवळ उभी करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.यासाठी प्रशासनासह प्रत्येकाने ती आपली जवाबदारी समजणे गरजेचे झाले आहे.तसेच आपल्या परिसरात वा सभोवताली अशा काही घटना आपल्या लक्षात आल्यास स्थानिक पोलीस प्रशासन ,महिला हेल्पलाईन ,दामिनी पथक आदींना तात्काळ माहिती देत नागरिकानीही अशा प्रकाराना आळा घालण्यासाठी पुढे येणे गरजेचे झाले आहे.