माफसूच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकास राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार

नागपुर :- नागपुरातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत असलेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक दिनेश गिन्नारे याला राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला. आज राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांचे हस्ते त्याने पुरस्कार स्वीकारला.

सदर पुरस्कार त्यांनी केलेल्या उल्लेखनीय समाज कार्याबद्दल आणि विशेषतः कोविडच्या काळात केलेल्या कार्याबद्दल देण्यात आला.

दिवेशला यापूर्वी महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त झाला होता आणि त्याच्या नावाची शिफारस राष्ट्रीय स्तरावर करण्यात आली होती.

दिनेशच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर भेटलेल्या पुरस्काराबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दिनेशने त्याच्या यशाचे श्रेय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सोमकुवर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली बांठीया आणि कार्यक्रम समन्वयक डॉक्टर राजेश लिमसे यांना दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

20 गजराजची झुंड गोंदिया जिल्ह्यात !खोळदा-बोळदा परिसरात दर्शन...गावकऱ्यांना दिला अलर्ट..

Mon Sep 26 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गडचिरोली –  जिल्ह्याच्या जंगलात वास्तव्यास असलेले गजराज गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले असून आज शंकरपूर, बोळदे मार्गे ते गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खोळदा गावानजीकच्या जंगलात अनेकांनी बघितले आहेत।काही प्रमाणात शेतातील धानपिकाचे नुकसान केल्याचेही सांगितले जात आहे.तब्बल सुमारे 20 गजरांची हा झुंड आहे.आसाम राज्यातील माहूत महाराष्ट्रातील लोकांना पूर्वी गजराजचे दर्शन घडवीत असत.मात्र आता प्रत्यक्षात गजराजाचे दर्शन गोंदिया जिल्ह्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights