आज १ मे ला ‘ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ‘चे उद्घाटन

रामटेक :- आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूरच्या वतीने रामटेकच्या गांधी चौक स्थित सुतीकागृह येथे ‘ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ‘ कार्यान्वित झाले असुन उद्या दिनांक १ मे रोजी सकाळी १० वाजता अॅड. आशिष जयस्वाल, आमदार विधानसभा क्षेत्र रामटेक यांच्या प्रमुख उपस्थितीत एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आपला दवाखाना केंद्राचे व्हिडओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या दवाखान्याची ओ.पी.डी. वेळ ही दुपारी २ ते रात्री १० वाजतापर्यंत ठेवण्यात आल्याने येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. इतर शासकिय दवाखान्यात ओ.पी.डी. ची वेळ ही सकाळी किंवा दुपारच्या सुमारासच संपुन जात असते मात्र आपला दवाखाना येथे रुग्नांसाठी ही अधिकची सुविधा ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे रुग्णांसाठी लाभदायक बाब म्हणजे येथे रुग्णांच्या दुर्धर आजारावर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे तज्ञ डॉक्टरांचे मत घेऊन त्याप्रमाणे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी दिली. तेव्हा ज्यास्तीत रुग्णांनी येथील सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार व अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय रामटेक यांचे तर्फे करण्यात आलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेफ अँड स्पीडी ऑटो चे उद्घाटन

Mon May 1 , 2023
नागपूर :- दक्षिण नागपुरात दुचाकी व चारचाकी वाहनांकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या “सेफ अँड स्पीडी ऑटो” सर्विस स्टेशन चे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते आणि आमदार मोहन मते, भाजपा शहर उपाध्यक्ष श्रीकांत आगलावे आणि उपस्थित जनसमुदायाच्या सक्रिय उपस्थितीत करण्यात आले. सेफ अँड स्पीडी ऑटोचे संस्थापक व सर्वेसर्वा सुशांत गायधने आणि पराग मौंदेकर यांनी नितीन गडकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com