सावनेर :- अंतर्गत १० कि. मी. अंतरावरील वार्ड क्र. ५ बाजार चौक पाटनसावंगी येथे दिनांक: २४/०५/२०२३, २१.४५ वा. या सुमारास फिर्यादी नाम- किशोर वामन नरजिवे, वय ५८ वर्ष, रा. वॉर्ड नंबर ५ पाटणसावंगी ता. सावनेर जि. नागपुर हा दि. २४/०५/२०२३ रोजी रात्री ०९.४५ वा. चे सुमारास आपले किशोर Araria मरजवे ज्वेलर्स सोने चांदीचे दुकान बंद करून दुकानातील १) सोन्याची लगड २० ग्रॅम किंमती १,००,०००/- रुपये, २) सोन्याचे बनवलेले दागीने २० ग्रॅम किंमती अंदाजे १,०००,००/- रुपये, ३) सोन्याचे बनवलेले कानातले टॉप्स ३० ग्रॅम किंमती १,५०,०००/- रुपये, ४) सोन्याचे बनवलेले डोरले २० ग्रॅम किंमती १,००,०००/- रुपये, ५) सोन्याचे बनवलेले तार, वाळी, पिटीव मणी व दोड़ मणी अंदाजे ४० ग्रॅम २,००,०००/- रु ६) सोन्याच्या बनवलेल्या लेडीज अंगठया २० ग्रॅम किंमती १००००० /- रुपये, ७) पत्नी संगिता हिचे बॅगमध्ये असलेल्या दागीन्याचे डब्यात सोन्याचा लक्ष्मीहार व मंगळसूत्र ५० ग्रॅम किमती २,५०,०००/- रु. असा एकुण १८० ग्रॅम सोन्याचे बनवलेले दागीने व सोन्याची २० ग्रॅम लगड किंमती अंदाजे १०,०००,००/- लाख रुपये सदर मुद्देमाल एका थैलीमध्ये भरून मोटरसायकलवर जात असताना त्याचे दुकानासमोर तीन अनोळखी इसमा पैकी एका इसमाने फिर्यादीच्या गाडीवर ठेवलेली बॅग घेऊन गेला. फिर्यादीने त्याचा पाठलाग करीत असता दोन अनोळखी इसमांनी कोणत्यातरी हत्याराचा फटाक्यासारखा आवाज करुन भिती निर्माण करून फिर्यादीचे सोन्याचे दागीने असलेली थैली चोरी करून नेली आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीतांविरुध्द कलम ३९२, ३४ भादंवी सह कलम ३/२५ शस्त्र अधिनीयम १९५९ कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीतांचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे पोस्टे सावनेर हे करीत आहे…