संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी : युवक काँग्रेसतर्फे माजी आमदार स्व.यादवराव भोयर स्मृती फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान मिलिटरी ग्राऊंडवर करण्यात आले आहे. फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन काल बुधवार (ता.८) रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व काँग्रेस नेते सुरेश भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त कमांडर ब्रिगेडियर ए.टी.ओरी , वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, जुनी कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे उपस्थित होते.
इर्शाद शेख यांनी सर्व पाहुण्यांचे शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोद मानवटकर, मीर आरिफ अली, इद्रिस नागानी, धीरज यादव, अनिकेत शहाणे, मोबीन अहमद, किशोर धांडे, डॉ.कमाल , डॉ. अर्शद कमाल, नगरसेवक मो उबेद सईद अफरोज, राजेश बनसिंगे, नरेंद्र शर्मा, राजकुमार गेडाम, मनोज यादव, तुषार दावानी, आकाश भोकरे, हर्षद खडसे आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील पहिला सामना ग्रीन फ्लॅग विरुद्ध अल-कौसर वायएमएफसी यांच्यात झाला ज्यात अल-कौसर वायएमएफसीने ३-१ असा विजय मिळवला. तर दुसरा सामना हॉट आईस बीबी कॉलनी विरुद्ध एम.एच.एम वारिसपुरा यांच्यात झाला, त्यात हॉट आईस बीबी कॉलनी संघाने ४-० असा सामना जिंकला.या स्पर्धेचे आयोजन युवक काँग्रेसचे विदर्भ झोन युनिट मॅनेजमेंट इन्चार्ज इरशाद शेख यांनी केले असून या फुटबॉल स्पर्धेत प्रथम विजेत्या टीमला ५१ हजार तर उपविजेत्या टीमला ३१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून कामठी व नागपूर येथील १२ संघांनी सहभाग घेतल्याची माहिती आयोजक इर्शाद शेख यांनी दिली. फुटबॉलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फुटबॉल स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.