धरमनगर नागरिकांना शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याने आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

नगराध्यक्षा आष्टणकर ना शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याने आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत धरम नगर येथे शानु सिद्धिकी याने स्थानिक नागरिकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने तसे च नगराध्यक्षा आष्टणकर हयाना सुध्दा अश्लील शिवी गाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोस्टे ला नागरिकांच्या व नगराध्यक्षाच्या लेखी तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपा स करित आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.१७) जुन ला रात्री ११ ते ११.२० वाजता दरम्यान शानु समशेर सिद्धिकी वय ३८ वर्ष राह. धरम नगर कन्हान हा प्रभा ग क्र. ५ चे स्थानिक धरमनगर च्या नागरिकांना व मुलां ना खेळतांना मारहाण करणे, येणाऱ्या जाणाऱ्या महि लांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे आणि शानु सिद्धिकी यास समजुत काढण्यास गेले असता जीवे मारण्याची धमकी देतो. अश्या फिर्यादी स्थानिक नाग रिकांच्या लेखी तक्रारीने कन्हान पोलीसांनी आरोपी शानु सिद्धिकी यांचे विरुद्ध अप क्र ३७१/२२ कलम २९४, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे. तसेच शुक्र वार (दि.१७) जुन ला रात्री ११.३० ते ११.४५ वाजता दरम्यान कन्हान नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर या आपल्या पती व दोन मुली सह लग्नावरून घरी येताना दुर्गा मंदीर जवळ आले असता तिथे कन्हान पोलीस आल्याने काय झाले असे विचारून घरी जात असतां ना शानु समशेर सिद्धिकी याने नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांना शिवीगाळ करून ” तुझे काट डालुंगा, छाट डालुंगा ” व अश्लील भाषेत विनाकारण शिवीगा ळ केली. या अगोदर सुध्दा शानु समशेर सिद्धिकी याने नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या घरी चाकु घेऊन जाऊन शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीस स्टेशन ला तक्रार दिली होती. त्यामुळे त्यांने दुस-यांदा परत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. अश्या फिर्यादी करूणाताई आष्टणकर यांच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या आदेशाने आरोपी शानु समशेर सिद्धिकी यांचे विरुद्ध अप क्र ३७०/२२ कलम २९४, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे हे करित आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com