भूषण नगरात वीज चोरी प्रकरणात धाड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठीत वीज चोरी प्रकरणाला आळा बसावा यासाठी विद्दूत विभागातर्फे भूमिगत वीज वाहिनी द्वारे विद्दूत सेवा देत असले तरी महावितरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणा मुळे बऱ्याच विद्दूत खांबाची भूमिगत वीज वाहिनी विद्दूत सेवा सुरू न केल्याने खांबावरून आकोडा घालून वीज चोरी करण्याचे प्रमाण अजूनही कायम आहे त्यातच प्रमाणिकतेने वीज बिल भरणारे उपाशी आणि चोरटे विद्दूत ग्राहक तुपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे तसेच इलेक्ट्रॉनिक विद्दूत मीटर मध्ये तंत्रिकीय पद्धतीने चोरी करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे त्यानुसार नागपूर महावितरण कंपनी च्या भरारी पथकाने भूषण नगर येथे एका संशयित घरी मीटर तपासणी केली असता या,मीटर द्वारे मागील एक वर्षांपासून विद्दूत चोरी केल्याचे निष्पन्न होताच 22 हजार 652 वीज युनिट चोरी प्रकरणात 8 लक्ष 2 हजार 890 रुपयांची वीज चोरी झाल्याचे लक्षात आले त्यानुसार तडजोडीची रक्कम 42 हजार रुपये असा एकूण 8 लक्ष 44 हजार 890 रुपये चा भरणा न केल्याने आरोपी वीज ग्राहकाच्या घरचा विद्दूत मीटर जप्त करून आरोपी विरुद्ध भारतीय वीज कायदा 2003 सुधारित 2007 कलम 135 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अवमान करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांचे वर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाणेदाराला दिले निवेदन

Thu May 30 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनादरम्यान भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाळण्याचे विकृत कार्य केल्याबद्दल त्यांच्या या कार्याचा भारतीय जनता पार्टी कामठी तालुक्याच्या वतीने निषेध करून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन कारवाई करण्याच्या मागणीसाठी नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद मोरे यांना निवेदन दिले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com