संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सोमवार ला जाहीर झालेल्या 10 वी सी बी एस ई च्या निकालात श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले. प्रावीण्य प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या अध्यक्षा किशोरी भोयर , उपाध्यक्षा अनुराधा भोयर, सचिव सुरेश भोयर यांनी कौतुक केले. शाळेच्या प्राचार्या डॉ. ईशा मुदलीयर यांनी सुध्दा यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये जीनी पवन जैन (97%,) युगांत धांडे (96.20%), रवी सिंग (95.60%), दोरोठी रेवतकर (93.80%), रजत भारुका (92.80), परिणीती कलचुरी (91.80%), मैत्री बोरकर (90.80%), स्निकधा गजभिये (90%), सुनय कापसे (90%), हर्ष अग्रवाल (89.80%), स्नेहल सरोदे (89.80%) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या शिक्षकांना आणि आई वडिलांना आणि शाळेच्या प्राचार्य ,उपप्राचार्य यांना दिले.
शाळेच्या प्राचार्या डॉ. ईशा मुदलियार, उप प्राचार्य अविनाश धोटे, यांचे सह शिक्षिका सिमा गडकरी, सुषमा गायकवाड़, संपा विश्वास , शिवाणी यादव,सोनल शर्मा, कविता विघे, अंकिता साखरकर आदींनी प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सोबतच संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, व उपाध्यक्षा अनुराधा सुरेश भोयर , सचिव सुरेश भोयर यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्यात.