संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 5:- स्थानिक कढोली गाव मार्गे विना रॉयल्टी अवैधरित्या विना परवाना ट्रक क्र एम एच 36 ए ए 3445 ने वाळू वाहून नेत असता रात्रगस्तीवर असलेल्या महसूल पथकाने सदर ट्रकवर धाड घालून अवैधरित्या वाहून नेणारे 5 ब्रास वाळू जप्त करीत पुढील कायदेशिर कारवाहिस्त्व ट्रक मौदा पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.तसेच वारेगाव शिवारात बोलेरो क्र एम एच 40 एन 5881 ने अवैधरित्या वाहतूक करोत असलेले 1 ब्रास वाळू जप्त करीत पुढील कारवाहिस्त्व बोलेरो खापरखेडा पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.
ही यशस्वी कार्यवाही तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनार्थ परिविक्षाधीन नायब तहसीलदार राजेश माळी, मंडळ अधिकारी संजय अनव्हाने,तलाठी नितीन उमरेडकर, काशिनाथ भेंडे आदी उपस्थित होते