खासदार क्रीडा महोत्सव, योगासन स्पर्धेचे उद्घाटन

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत योगासन स्पर्धेचे बुधवारी (ता.१८) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी आमदार मोहन मते, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी,  जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाउ खांडवे, नागपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्ष गिरजा अग्रवाल, सचिव अनिल मोहगावकर, उपाध्यक्ष आरती अगवाल, माजी नगरसेवक विजय झलके, भगवान मेंढे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश खरे आणि संचालन भूषण टाके यांनी केले तर आभार संजय निकुडे यांनी मानले.

९, ११, १३, १५, १८, २१ आणि २५ वर्षाखालील वयोगटास्ह २५ वर्षावरील वयोगटात योगासन स्पर्धा घेण्यात येत आहे. २० जानेवारी पर्यंत स्पर्धा चालेल.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com