राष्ट्रीय पदक विजेते बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थ्यां चा सत्कार 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- सैम्बो रेसलिंग चॅम्पियन शिप खेळाची राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रातील संभाजी नगर येथे पार पडली. यात नागपुर जिल्हयाने वीस पदक पटकाविले असुन बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थी खेडाळुनी अकरा पदक जिकुन शाळेचे नाव लौकीक केल्याने या विजेते खेडाळुंचा शाळेच्या वतीने थाटात जल्लोषात सत्कार करण्यात आला आहे.

संभाजीनगर, महाराष्ट्र येथे (दि.२६ ते ३०) जानेवारी दरम्यान सैम्बो रेसलिंग चॅम्पियन शिप खेळा चे आयोजन केले होते. या राष्ट्रीय स्तरावरील खेळात बीकेसीपी शाळेतील २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा खेळ अतिशय कठिण असुन देखील विद्या र्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या खेळात नागपुर जिल्हाने स्वर्ण १०, रजत ०६ व कास्य ०४ असे २० पदक प्राप्त केले असुन बीकेसीपी शाळेतील विद्यार्थ्यानी स्वर्ण ०७, रजत ०३ व कास्य ०१ असे ११ राष्ट्रीय पदक जिकुन प्राविण्य प्राप्त करित स्वत:चे, आई वडिलांचे आणि शाळेचे नाव गौरान्वित केल्याने सोमवार (दि.२६) फेब्रुवारी ला बीकेसीपी शाळेच्या पटांगणात सत्कार समारंभात विजेत्या खेडाळुचे शाळेच्या मुख्याध्यापिका नाथ , प्राथमिक मुख्याध्यापिका रूमाना , जेष्ट शिक्षक विनयकुमार वैद्य यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, विविध भेट वस्तु देऊन जल्लोषात सत्कार करून प्रोत्साहित करण्यात आले .

पदक विजेते विद्यार्थ्यी खेडाळुनी आपल्या यशाचे श्रेय क्रिडा शिक्षक अमितसिंग ठाकुर हयांना दिले. यावेळी नाथ आणि अमित यांनी आपल्या मार्गदर्शनातुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. पालक अनिल मगर यांनी मुलांना प्रोत्साहनपर दोन शब्द संबोधित केले. मोतीराम रहाटे व शांताराम जळते हयांनी शाळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा सुंदर प्रतिमा भेट देऊन गौरव केला. या प्रसंगी अजय ठाकरे, रविन्द्र कोटपल्लीवार, सुभाष मदनकर, अमित उमरे, राजेंद्र मानकर, सचिन यादव, शर्मा , शारिक अंसारी, योगेश्वर खरवार, संतोष सिंग, निक्खी सिरिया, क्रीर्ती बोरकर, शिल्पा सिरिया, आरती कोटपल्लीवार सह विजयी विद्यार्थ्यांचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्योत्सना लांजेवार  हयांनी करून संपुर्ण कार्यक्रम शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंदानी अतिशय आनंदाने यशस्विरित्या पार पाडत जल्लोषात साजरा केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोयना (शिव सागर) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Tue Feb 27 , 2024
– महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार मुंबई :-  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे शिव सागर जलाशयामध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार झाला. विधानभवन येथे झालेल्या सामंजस्य करारावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights