जखमा अश्या सुंगधी झाल्यात काळजाला…. भीमराव पांचाळे यांच्या गजल मैफीलीने रसीक सुखावले

– महासंस्कृती महोत्सवाला सुरांची उधळण

भंडारा :- रसीकांच्या कान व मनाची तृप्ती करणारे प्रख्यात गजलनवाज भीमराव पांचाळे यांचे स्वर..किशोर बळीचे तितकेच चपखल संचलन ,दाद देणारे रसीक तसेच वाहवा मिळवणारे ईलाही जमादार यांचे शेर जखमा अश्या सुंगधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा..

प्रत्येक रसीक हा बोलका शायरच असतो.51 वर्ष गझलची साधना करणारे गझलगायक भीमराव पांचाळे व त्यांची कन्या भाग्यश्री पांचाळे यांच्या मैफीलीने काल महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या संध्याकाळी रसीकजनांना गजलेची कर्णमधुर पर्वणी उपलब्ध करून दिली. आयुष्यात मैत्र असेल तर श्रीमंती असते..हे सांगताना यार पाहिजे तुझ्यासारखा..आधार दे तुझ्यासारखा..या शेराने मैफीलीला उंची दिली.जीवनाला दान दयावे लागते श्वास संपेपर्यत जगावे लागते,

हा शेर असो की पेरल्या ज्यांनी सुरुंगाच्या लडी दोस्त त्यांनाही म्हणावे लागते..हे ही कटू सत्य सांगणा-या गजलेला रसीकांची दाद मिळाली. भाग्यश्री पांचाळेनी जीवलग माणसाचे आयुष्यातील स्थान सांगताना तू फुलांचा घोस माझा.. तू सुंगधी श्वास माझा म्हणत रसीक मनांची तार छेडली. तर अमरावतीच्या नितीन भटाची नको हे गगन नको ही धरा.. दे मनाचा रीता कोपरा.. गझल ही प्रेमाच्या पलीकडेही सामाजिक परिमाण घेउून येते.तेव्हा प्रश्न विचारते..

माणसातच देव जर आहे म्हणे.. पत्थरांना का पुजावे लागते .. या प्रश्नांनी रसीकांना विचार करण्यास प्रवृत्त्‍ केले. रात्री आठ वाजता सुरू झालेल्या या मैफीलीला शुंभागी मेंढे, जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी,जिप पदाधीकारी व माध्यम प्रतिनीधी तसेच रसीकांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. तत्पुर्वी रयतेचा राजा हे नाटक असर फॉऊडेंशने सादर केले.70 कलावंताच्या चमूने शिवाजी महाराज्याच्या अष्टपैलु व्यकतीमत्वाचे यथोचित सादरीकरण केले.त्यांचा सत्कार करण्यात आला.

याच मंचावर गझलकार प्रल्हाद सोनावणे, साहीत्यीक प्रमोदकुमार अणेराव व नरेश आंबिलकर यांचा हृदय सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरास अटक, ०५ गुन्हे उघडकीस, २,९५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त

Wed Jan 31 , 2024
नागपूर :- पो. ठाणे गिट्टीखदान हद्दीत, मानवता नार, येथे राहणारे फिर्यादी मनिष अरूण भोयर, वय ३३ वर्षे, यांनी त्यांची हिरो होन्डा एलेंडर प्लस क्र. एम. एच ३१ ई.एल ८६०६, किंमती २०,०००/- रू. ची घरासमोर पार्क करून, स्प्रंक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भादवि. अन्वये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com