वाहन चोरास अटक, ०५ गुन्हे उघडकीस, २,९५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- पो. ठाणे गिट्टीखदान हद्दीत, मानवता नार, येथे राहणारे फिर्यादी मनिष अरूण भोयर, वय ३३ वर्षे, यांनी त्यांची हिरो होन्डा एलेंडर प्लस क्र. एम. एच ३१ ई.एल ८६०६, किंमती २०,०००/- रू. ची घरासमोर पार्क करून, स्प्रंक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भादवि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासात पोलीस ठाणे गिट्टीखदान चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून तसेच, पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या माहितीवरून, सापळा रचुन आरोपी रितीक लेखीराम लांजेवार, वय २१ वर्षे रा. चंद्रमणी चौक, कंट्रोल वाडी, अमरावती रोड, नागपुर यास नमुद वाहनासह ताब्यात घेवून त्यांनी सखोल विचारपूस केली असता, त्यांन वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी केलेले वाहन जप्त करण्यात आले. आरोपीची अधिक सखोल विचारपुस केली असता, त्यांने पो. ठाणे गिट्टीखदान हरीतुन सुझुकी जिक्सर गाड़ी क. एम.एच. ३१ एफ.एम १६६६ किंमती १,००,०००/- रू. ची व डियो मोपेड गाडी क. एम.एच ३१ एफ.डी ७७२७ किमती २०,०००/- चोरी केल्याची कबुली दिली, तसेच पो. ठाणे अंबाझरी हद्दीतुन, रॉयल ईन्फील्ड गाडी क. एम.एच. ३१ एफ.ई ९७०८ किंमती १,२५,०००/- रू. ची चोरी केल्याची कबुली दिली, तसेच पो. ठाणे प्रतापनगर हद्दीतुन, होन्डा सिबीआर गाडी क्र. एम. एच. ३७ यू ८४३६ किंमती ३०,०००/- रू. ची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन नमुद बाहने जप्त करण्यात आले आहे.

गिट्टीखदान पोलीस ठाणे चे अधिकारी व अंमलदार यांनी गिट्टीखदान येथील तिन, अंबाझरी व प्रतापनगर हद्दीतुन प्रत्येकी एक वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेवुन, त्याचेकडुन वाहन चोरीचे ०५ गुन्हे उघडकीस आणुन एकुण किंमती २,९५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (परि क. २) यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि महेश सागळे, पोउपनि गोपाल राउत, पोहवा बलजीत ठाकुर, अजय यादव, अशोक रामटेके, ईशांक आटे, पोअ. आकाश लोचे सचिन खडसे, नितेश वाकडे, नागनाथ कोकरे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खंडणी मागणाऱ्या तृतीयपंथी आरोपींना अटक

Wed Jan 31 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत प्लॉट नं. १०६, चिटनीस नगर, शिवसेना चौक जवळ, राहणारे फिर्यादी कुणाल जागेश्वर मेश्राम वय ३२ वर्ष, यांचे मुलीचा वाढदिवस कार्यक्रम असल्याने घरासमोर पेंडाल टाकलेला होता. पेंडाल दिसल्याने तेथे आरोपी १) पुजा उर्फ जोया लखन वर्मा वय २५ वर्ष २) तन्नू विजय मोरे वय ३४ वर्ष ३) ग्लोरी संध्या मल्हारी वय २२ वर्ष सर्व रा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com