संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- कामठी तालुक्यातील येरखेडा येथील शेकडो युवक काँग्रेसकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असून भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे पक्षप्रवेश स्वागत केले. भाजप ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोहेकर यांचे मार्गदर्शनात येरखेडा येथील काँग्रेसचे पदाधिकारी मुकेश कनोजिया ,लक्ष्मण सरोदे ,शुभम जीवने ,स्वप्निल ढोबळे यांचे सह शेकडो युवक काँग्रेसकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे पक्ष प्रवेश साचे स्वागत केले व पक्षात कार्य करून नागरिकांची सेवा करण्याचे आव्हान केले.