संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी महोत्सव
-जिल्हा वकील संघ नागपूर आणि ओगावा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाणे नागपूर जिल्हा विधिज्ञ सम्मेलन
कामठी :- कर्मवीर दादासाहेब जन्मशताब्दी महोत्सव वर्षानिमित्त विविध शैक्षणिक ,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने नागपूर जिल्हा वकील संघ आणि ओगावा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कॅम्पस ,दादासाहेब कुंभारे परिसर येथे उद्या 26 मार्च ला सकाळी 11 वाजता नागपूर जिल्हा विधिज्ञ संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई राहतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ड्रॅगन पॅलेस ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे राहतील.
आयोजित नागपूर जिल्हा विधिज्ञ संमेलनात कायद्याचे राज्य आणि कायद्यापुढे समानता महिला विषयीचे कायदे या परिसंवाद विषयावर दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई मौलिक मार्गदर्शन करतील .या परिसंवादाला वरिष्ठ विधिज्ञ ऍड फिरदोस मिर्जा, नागपूर जिल्हा वकील संघटना चे अध्यक्ष ऍड रोशन बागडे,नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज चे प्राचार्य डॉ प्रवीण खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नुकतेच 22 व 23 मार्च ला दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी महोत्सवाचे शुभारंभ मोठ्या थाटात पार पडला असून याच महोत्सव शुभरंभाचा दुसरा टप्पा म्हणून नागपूर जिल्हा विधिज्ञ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.कामठी शहरात पहिल्यांदाच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहतील त्यामुळे विविध लोकांमध्ये मोठा उत्साह आहे या संमेलनाला वकिलांनी व विधिज्ञ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा वकील संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड रोशन बागडे यांनी केले आहे.