कन्हान चाकु हल्यातील तीन आरोपींना अटक चौथ्या  आरोपी चा शोध घेत आहे
कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस एक कि मी अंतरावरील पांधन रोड ओम बुक डेपो जवळ चार आरोपी ने जुन्या डिजे वाजविण्याचा कारणावरून युवकास चाकुने मारून दुखापत करित गंभीर जख्मी केल्या प्रकरणी कन्हान पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली असुन एका आरोपी चा शोध घेत आहे .
            प्राप्त माहिती नुसार शुक्रवार दिनांक ११ मार्च ला रात्री ८:४५ ते ९:१५ वाजता दरम्यान रितीक नेपाल गजभिये वय २३ वर्ष राह. वार्ड क्र.१ गोंडेगाव हा टाटा एस चारचाकी वाहन क्र. एम एच ४० बी एल ८५९१ हे भरगच्छ लोकवस्ती च्या पांधन रोडवरील ओम बुक डेपो जवळ उभी केली असता आरोपी गज्जु व त्या सोबत अन्य तीन आरोपी हे स्पेलंडर दुचाकी वाहनाने येवुन जुन्या डिजे वाजविण्याचा कारणावरून चार आरोपीतांनी संगमत करून रितीक नेपाल गजभिये याला चाकुने पुठ्ठ्यावर (ढुगणावर), डोक्याचा मध्य भागी व नाकावर चाकुने मारून गंभीर दुखापत करित जख्मी केले. सदर प्रकरणानी कन्हान पोलीसांनी फिर्यादी रितीक गजभिये यांच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी गज्जु व इतर तीन असे चार आरोपी विरुद्ध कलम ३०७, २९४, ३४, ४, २५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे सहायक पोली स उपनिरीक्षक सतिश मेश्राम व कन्हान पोलीस डी. बी पथकाने आरोपीचा शोध घेत घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलीसांनी आरोपी १) गज्जु ऊर्फ गजानन अजाब कडनायके, २) अंशुल नरेश गजभिये, ३) नाबालिग अश्या तीन आरोपींना अटक करून चौथ्या एका आरोपी चा शोध सरू आहे. ही कारवाई उपवि भागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, राहुल रंगारी, विशाल शंभरकर, जितु गावंडे सह पोलीस सहका-यांनी यशस्विरित्या कार्यवाही पार पाडत आहे
Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com