हजारोच्या संख्येतील अनुयायांनी घेतला भव्य भोजनदानाचा आस्वाद

संदीप कांबळे, कामठी

-प्रभाग क्र 15 आनंद नगर येथे भव्य भोजनदान वितरण

कामठी ता प्र 26:-कामठी येथील प्रभाग क्र 15 येथे आनंद नगरातील संघमित्रा बुद्ध विहार समितीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त भोजनदान कार्यक्रम काल सोमवार 25 एप्रिल ला आयोजित करण्यात आला होता.या भोजनदानाचा हजारो च्या संख्येतील अनुयायांनी आस्वाद घेतला.
प्रारंभी तथागत गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्याना माजी नगरसेविका संध्या उज्ज्वल रायबोले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले .
याप्रसंगी जितेंद्र खोब्रागडे,जयाताई मेश्राम,विद्याताई बोंबले,अनिताताई फुलझेले,सरिताताई मेश्राम,भारतीताई कनोजे,रमाताई शेंडे,जयाताई चंद्रिकापुरे,अमिताताई गजभिये,प्रितीताई देशभ्रतार, शारदाताई घोडेस्वार, प्रमिलाताई नारायणे,निशाताई मेश्राम,नंदाताई आमधरे आदी उपस्थित होते.
भोजनदान कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विक्की बोंबले,बिरजू चहांदे,महेंद्र वंजारी,अवि गायकवाड,मोहन निर्मलकर, संजय देशभ्रतार, अमोल तिरपुडे,बादल कठाणे,रविंद्र मरई,नरेंद्र टंडन, यमन शाहू,राजहंस वैद्य,प्रशांत नगरकर,सुनील हजारे,हितेश तिरपुडे,दिनेश खेडकर, विलास शिंगाडे,आशिष रामटेके यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येरखेडा ग्रामपंचायत मध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ता बांधकामात भ्रष्टाचार

Tue Apr 26 , 2022
संदीप कांबळे, कामठी कागदोपत्री कामकाज दाखवून केली पैशाची उचल सरपंच मंगला कारेमोरे व सचिव दोषी असल्याचा चौकशी समितीचा ठपका कामठी ता. प्र २६ : दलितवस्तीमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौध्दांचा विकास व्हावा म्हणून शासन मोठया प्रमाणात निधी देत आहे. मात्र, हा निधीचा गैरवापर करून ठरावामध्ये दलितवस्तीसाठी निधी मिळवून घ्यायचा आणि तो निधी आला की, काम न करताच काम केल्याचे फक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!