सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८० प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. २५) रोजी शोध पथकाने ८० प्रकरणांची नोंद करून ४९ हजार ९०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी हातगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १८ प्रकरणाची नोंद करून ७,२०० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून २०० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून ८०० रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत ३ प्रकरणांची नोंद करून रु ६००० दंड वसूल करण्यात आला. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ९ प्रकरणांची नोंद करून रु १४,५०० दंड वसूल करण्यात आला. या उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास या अंतर्गत ३१ प्रकरणांची नोंद करून रु ६२०० दंड वसूल करण्यात आला.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था )असल्यास या अंतर्गत १५ प्रकरणांची नोंद करून रु १५,००० दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे संदीप सरदार, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे धनराज कावळे, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वे. को. लि. मुख्यालय हे शासकिय कार्यालय, जनसामान्य लोकांसाठी खुले करण्यात आले खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रयत्नानेच हे शक्य झाले.

Wed Apr 26 , 2023
नागपूर :-वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) चे सिव्हिल लाईन्स, नागपुर येथे मुख्यालय WCL द्वारे महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या १० क्षेत्रातुन कोळसा उत्खननाचे काम केले जाते. मागील कोरोना काळापासून या शासकिय कार्यालयात संबंधित मुस्वामी/ भुधारक आश्रीत, भुतपुर्व कर्मचारी इतर संबंधीत लोकांना प्रवेशास बंदी घालण्यात आली होती. WCL च्या संबंधीत अधिकाऱ्याने ज्यांना भेटण्याची इच्छा दर्शविली फक्त अश्याच व्यक्तींना सुरक्षा विभागाद्वारे भेटी साठी कार्यालयात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com