ताडाळी सेवा सहकारी संस्था ताडाळीच्या वतीने 62 लाख 33 हजार रुपयांचे पिक कर्ज वाटप

चंद्रपूर :-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर शेतकरी बँक म्हणून ओळखली जाते. खरीप हंगाम सन २०२०-२२ मध्ये दिलेल्या पीक कर्ज वाटपाचे लक्षांक ११० टक्के पूर्ण करून अन्य बँकांच्या तुलनेत प्रथम ठरली होती. खरीप हंगाम २०२२-२३ या वर्षातही सर्वात आधी पीक कर्ज वाटपाला सुरुवात करून आघाडी घेतली आहे.

ताडाळी सेवा सहकारी संस्था ताडाळीच्या वतीने नुकतेच 56 सभासदांना 62 लाख 33 हजार रुपयांचे पिक कर्ज वाटप केले असून यावेळी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हेमराज पाटील दिवसे, संस्थेचे सचिव सुरेश लोणारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक सुरेश गणपतराव निखाडे, निरीक्षक रोशन तुरारे, सचिन चटकी, शिपाई विजय बिबटे, रेखाबाई कासवटे नथू उगे यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबिन, मिरची पिकांसाठी मोठ्या प्रमाणात कर्जवाटप होते. कर्जाचे दर प्रति एकर धान २२ हजार २०० कापूस बागायत २८ हजार ५०० कापूस जिरायत २२ हजार ३०० सोयाबीन २१ हजार १०० व मिरची पिकाकरिता ४३ हजार ३०० दर निश्चित करण्यात आला आहे.

नियमित पीक कर्ज व इतर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज घेताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली. शेतकरी हित लक्षात घेऊन शासनाच्या धोरणानुसार निर्णय घेण्यात आला असे मत बँकेचे शाखा व्यवस्थापक सुरेश गणपत निखाडे यांनी सांगितले.

NewsToday24x7

Next Post

Muttemwar writes Maharashtra Dy CM Fadanvis, urges to cancel proposed thermal power plant expansion as concerned citizen

Wed May 24 , 2023
Nagpur :- Vishal Muttemwar, General Secretary, Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC) has written a letter to Maharashtra Deputy Chief Minister, Devendra Fadnavis, urging him to cancel the proposal by the Maharashtra State Power Generation Company (MAHAGENCO) to add two units of 660 MW each, totalling 1320 MW to the existing 2600 MW at Koradi Thermal Power Plant in Nagpur. Vishal […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com