मागील 87 वर्षांपासून श्रीकृष्ण मूर्ती स्थापनेची परंपरा अजूनही कायम..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्व कामठी तालुक्यात हर्षोलहासाने साजरा

कामठी ता प्र 22 :- जीवनाचे खरे तत्वज्ञान सांगणारा ,प्रेम माणुसकी शिकविणाऱ्या अश्या श्रीकृष्णावर असणारी श्रद्धा कायमस्वरूपी मनात बाळगून असलेल्या कामठी शहरातील रावेकर कुटुंबियात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येतो तर मागील 87 वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्वा निमित्त श्रीकृष्ण मूर्ती स्थापनेची परंपरा ही आजही कायम आहे.कामठी येथील राम मंदिर परिसर रहिवासी राजुसा महादेवराव रावेकर या माहुलीने आजच्या 87व्या वर्षांपूर्वी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चार आण्याची गोकुळमूर्ती आणून ही श्रीकृष्ण मूर्ती स्थापीत करून श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यात आला होता. आजच्या स्थितीत दोन पिढी लोटूनही ही परंपरा आजही कायम असुन यावर्षीच्या 87 व्या वर्षी सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त सहादेवराव महादेवराव रावेकर यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण मूर्ती स्थापित करण्यात आली तर आजच्या किमतीत ही गोकुळमूर्ती चार आण्याहून हजारोच्या किमतीत गणली जात आहे.श्रीकृष्णमूर्तीची स्थापना करून श्रीकृष्ण जन्म तसेच आरती व भजन कीर्तनाचे कार्यक्रमासह श्रीकृष्ण पर्व साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जितेंद्र रावेकर,संजय रावेकर, प्रवीण रावेकर, राजेश रावेकर, सुभाष रावेकर, हरीश रावेकर, मनीष रावेकर, नितीन रावेकर, निलेश रावेकर, रोशन रावेकर, अनुराग रावेकर यासह महिला व बालक वर्ग अनुयायी उपस्थित होते.

यानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्वनिमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापणा करून श्रीकृष्ण जन्म, आरती तसेच भजन कीर्तनाचे कार्यक्रमासह विविध समितीकडून हा पर्व हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या दोन चोरट्याना अटक...

Mon Aug 22 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -44 हजार 500 रुपये किमतीच्या चोरीच्या मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 22 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी कवठा मार्गावरील पप्पू प्रजापती बॉडी वर्कशॉप मधून दिवसाढवळ्या साडे चार दरम्यान दोन चोरट्यानी वर्कशॉप मधील केबल वायर , ड्रिल मशिन, ठिया लोखंडी , होल्डर असा एकूण एकूण 14 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेत असल्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!