दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या दोन चोरट्याना अटक…

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

-44 हजार 500 रुपये किमतीच्या चोरीच्या मुद्देमाल जप्त

कामठी ता प्र 22 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी कवठा मार्गावरील पप्पू प्रजापती बॉडी वर्कशॉप मधून दिवसाढवळ्या साडे चार दरम्यान दोन चोरट्यानी वर्कशॉप मधील केबल वायर , ड्रिल मशिन, ठिया लोखंडी , होल्डर असा एकूण एकूण 14 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना कळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून चोरट्याचा पाठलाग करून दोन्ही चोरट्यास अटक करण्यात यश गाठले तर या चोरट्याकडून चोरीस गेलेला 14 हजार 500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली वाहन एम एच 31 ई जे 9484 किमती 30 हजार रुपये असा एकूण 44 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर यासंदर्भात फिर्यादी पप्पू प्रजापती वय 36 वर्षे रा समर्थनगर नागपूर ने जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख जहिर उर्फ जॉनी शेख नजमुद्दीन वय 33 वर्षे रा कुतूबुद्दीन नगर, गिटीखदान नागपूर, इम्रान उर्फ सोनू दिलावर खान वय 29 वर्षे रा गिटीखदान नागपूर विरुद्ध भादवी कलम 379, 34 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.ही यशस्वी कारवाही डीसीपी सारंग आव्हाड, एसीपी संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, एपीआय राजेश गडवे, पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने, सहाययक फौजदार तंगराजन पिल्ले,रवींद्र गावंडे, विवेक, अश्विन चहांदे, गोपाल आदींनी केले असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जुनी कामठी पोलिसांनी नागरिकांना परत मिळवून दिले 14 मिसिंग मोबाईल..

Mon Aug 22 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 22: नागपुर परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या जुनी कामठी पोलिसांनी शुक्रवारी बाजार कामठी शहरातील तब्बल 14 नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल फोन परत मिळवून दिले आहेत. हे 14 मिसिंग झालेले मोबईल तक्रारदारांना जुनी कामठी पोलिसानी परत केले. हे हरविलेले 14 मोबाईल्स तब्बल 1 लक्ष 40 हजार रुपये किमतीचे होते.. मोबाईल फोन परत मिळालेल्या नागरिकांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights