संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपुर :- हिंगणा तालुक्यातील भीमनगर- ईसासनी परिसरातील बोधिमग्गो महाविहार येथे त्रिविध पावन वैशाख पोर्णीमे निमित्त पाच दिवसीय वेसाक उत्सव आयोजित करण्यात आला असून दिनांक २२मे पासुन २६मे पर्यन्त विविध विषयांवर आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
दिनांक २२ ला सायंकाळी ५ वाजता भदन्त बोधिविनीत परीसर येथे उद्घाटन समारोह भदन्त नाग दिपंकर महास्थविर यांचे हस्ते होणार असून उपरोक्त कार्यक्रमास प्रमुख अतिथि डाॅ. प्रा सुजित बोधी यांचे मार्गदर्शन होणार आहे, या प्रसंगी ९ते १५ वयोगटातील व १६ ते पुढे च्या विद्यार्थ्यांचा सहभागातुन चित्रकला स्पर्धा- बौद्ध चैत्य / स्तुप व तथागत बुद्धाचा जन्म, ज्ञान प्राप्ति, महापरिनिर्वाण सबंधित चित्र, सायंकाळी ६:३०ते ८:०० वाजेपर्यत,
गुरुवार, दिनांक २३ला त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा निमित्त व बोधिमग्गो चे संस्थापक अध्यक्ष परिनिब्बुत पूज्य भदन्त बोधिविनीत महास्थविर स्मृतिदिन निमित्त अभिवादनिय कार्यक्रम सकाळी ८:३० वाजता अष्टशील उपोषथ ग्रहण, सकाळी ठीक ९:०० वाजता रक्तदान शिबिर, १०:००धम्म देसना सकाळी ठीक ११:३० वाजता भीक्खुसंघास भोजन दान, संघदान व सामुदायिक भोजन दान सायंकाळी ५:०० वाजता भदन्त बोधिविनीत परिसरातुन भीमनगर- ईसासनी परिसरात धम्म रॅली आणि पथनाट्य, शुक्रवार, दिनांक २४ ला सायंकाळी ५:००ते ५:४५ पर्यन्त निबंध लेखन स्पर्धा १६ वर्षावरील विद्यार्थांकरिता विषय: तथागत बुद्ध व सम्राट अशोक, महाउपासिका विशाखा यांचे जीवन कार्य, चार आर्य सत्य, बुद्ध धम्मात दानाचे महत्व, व १४वर्षावरिल विद्यार्थ्यां करिता वक्तृत्व स्पर्धे चे आयोजन सायं. ६:०० वाजता, विषय : दैनंदिन जीवनात बुद्ध धम्मीचे महत्व, बौध्द धम्मच का – डाॅ बाबासाहेब आंबेडकर, धम्मपद ग्रंथाचे महत्व, तथागत बुद्ध मार्गदाता की मोक्षदाता, सम्राट अशोकाचे धम्म कार्य, शनिवार, दिनांक २५ ला सायंकाळी ५ वाजेपासुन ६:३० पर्यत नुत्य स्पर्धा बुद्ध गीतांवर आयुमर्यादा ९ ते १६, तथागत बुद्ध जीवनी संगितमय नाटक रात्री ७:००वाजता प्रस्तुती : रमाई बहुउद्देशिय महिला मंडळ गेडाम ले-आऊट, विवार, दिनांक २६ला समापन समारोह आणि बक्षिस वितरण सायंकाळी ठीक ५:३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सेपिएन्स अकॅडमी ऑफ फाईन आर्ट, स्टारवन डान्स स्टुडियो, बोधिमग्गो संडे स्कूल च्या माध्यमातुन स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणार्या विजेत्यांना प्रथम पुरस्कार १५००, द्वितीय पुरस्कार १०००, तृतीय पुरस्कार ५०० व सन्मान चिन्ह तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
उपरोक्त कार्यक्रमात सहभाग देऊन यशस्वीते करिता मोठ्या संख्येत उपस्थित राहून सहकार्य प्रदान करून धम्म कार्यात सहभाग दर्शवावा असे आवहान करण्यात येते आहे.
आयोजक डाॅ. भदन्त सीलवंस महास्थविर, बोधिमग्गो सेवा संस्था, बोधिमग्गो कम्युनिटी किचन, बोधिमग्गो संडे स्कूल, बोधिमग्गो वेलनेस सेंटर,भदन्त बोधिविनीत परीसर, भीमनगर – ईसासनी.