संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस व कन्हान पोलीसाची कारवाई.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नं. ३ मरघटी येथे स्थागुशा चे पोलीस व कन्हान पोलीसा नी धाड मारून जुगार खेळणा-या पाच आरोपीना पकडुन त्याच्या जवळुन ५२ तास पत्ते व नगदी १५२९० रूपये जप्त करून कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक पोलीस कन्हान परिसरात पेट्रोलिंग करित अस ताना कोळसा खदान नं.३ येथे जुगार सुरू असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने कन्हान पोलीसासह सोमवार (दि.१) ऑगस्ट ला सायंकाळी ४ ते ४.४५ वाजता दर म्यान कोळसा खदान नं. ३ मरघटी येथे धाड मारली असता काही इसम जुगार खेडताना दिसुन आले.पोलीसांना गणवेशात पाहुन पळु लागल्याने पाटलाग करून जुगार खेळणारे इसम १) राधेश्याम बहुजी मेश्राम वय २५ वर्ष २) सुरेंद्र महादेव करपे वय ४५ वर्ष, ३) राजेश टिकाराम पटले वय ३३ वर्ष सर्व राह.खदान नं.३ मडी बाबा, ४) संतोष रामसमुज धुर्वे वय ३३ वर्ष, ५) रामशा ही बिहारी यादव वय ४८ दोन्ही राह. दयानगर कामठी कॉलरी नं.३ हयाना पकडुन त्यांची अंगझडतीत ५२ तासपत्ते व नगदी १५२९० रूपये मिळुन आल्याने जुगार खेळणारे आरोपी १ ते ५ यांचे विरूद्ध कलम १२ मजुका अन्वये गुन्हा नोंद करून सदर कारवाई कन्हान पोस्टेचे सपोनि फुलझेले व स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे नाना राऊत, गजेंद्र चौधरी, रोहन डाखोडे सह पोलीस कर्मचा-यानी केली.