सार्थ पब्लिक स्कुलचा झुला चोरी; अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल..

सार्थ पब्लिक स्कुल चा झुला चोराने चोरून नेला

 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड वरील सार्थ पब्लिक स्कुल कन्हान येथील शालेय विद्यार्थ्या चा खेळण्याचा झुला रात्री चोराने चोरून नेल्याने कन्हान पोस्टेला अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      कन्हान शहरातील भरगच्छ लोकवस्तीत तारसा रोड वर असलेल्या सार्थ पब्लिक स्कुल कन्हान च्या आवारातील शालेय विद्यार्थ्याना खेळण्याकरिता अस लेला लोंखडी झुला शनिवार (दि.३०) जुलै च्या रात्री १२.३० ते रविवार सकाळी ७ वाजता दरम्यान अज्ञात चोरटयानी वाहनात टाकुन चोरून नेल्याने शाळेचे संचालक भुषणराव निंबाळकर पोलीस स्टेशन ला चोरी ची तक्रार देण्यास गेले असता कन्हान पोलीस चोरीची तक्रार नोंद करण्यास आणाकाणी करित हरविली किंवा दुसरी काहीही तक्रार देण्यास म्हणत होेते. म्हणजे अश्याच चोराना चोरी करू दयाच्या काय ? शाळेचे साहित्य चोरानी चोरी केल्याने आपणास चोरीची तक्रार नोंद करावी लागेल अशा आग्रह केल्याने कन्हान पोलीसानी अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस आरोपी चोरांचा शोध घेत आहे.

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत या एका वर्षात कोळसा, रेती, डिझेल, तांबे, लोखंड, विधृत लोखंडी खांब, ताराची चोरी होतच असते. घरफोडी, शेती साहित्य, विहीर पंप, बोरवेल पंप, जनावरे, ट्रक, चार चाकी तर दुचाकी ची भरदिवसा चोरीचे प्रमाण दिवसे दिवस वाढु लागले तरी कन्हान पोलीस या चोरीच्या आरोपीना पकडण्यास अपयशी ठरत असल्याने चोरट याचे हौसले बुलंद होऊन चो-या मोठा प्रमाणात वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण होऊन कन्हान थानेदार विलास काळे यांच्या कार्य प्रणालीवर वेगवेगळया चर्चा शहरात नागरिकात चांग ल्याच रंगत आहे

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com