दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी

– रामटेक शहर व तालुक्यात दहावीच्या निकालाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

रामटेक :-  नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात रामटेक तालुक्याचा एकूण निकाल % लागला आहे.रामटेक येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचा एकुण निकाल ८२.१७ एवढा लागलेला असुन प्रथम क्रमांक प्रेरणा लक्ष्मण गजभिये ( ८२.८०%) द्वितीय क्रमांक रिया अनील महाजन ( ८१.८०%) तृतीय क्रमांक जानवी नागोराव थोटे ( ७९.६०%)ने प्राप्त केला. समर्थ हायस्कुल रामटेक या शाळेचा एकूण निकाल ९२.१४% लागला असून शाळेतून प्रथम क्रमांक श्रेया मनोहर वानोडे (९२.६०%)द्वितीय क्रमांक मृनल विजयकुमार लांडे (९१.८०) , तृतीय जानवी प्रशांत फुरसुले (९०.८०), ने प्राप्त केला.

त्याचप्रमाणे समर्थ कॉन्व्हेंट रामटेक येथे प्रथम क्रमांक शर्वरी चरडे (९२ % ), द्वितीय शायली शेंडे (८७ %), तृतीय आर्या लांजेवार (८६ % ) तसेच शितलवाडीतिल ज्ञानदिप कॉन्व्हेंट येथे प्रथम क्रमांक ऐश्वर्या अंगतलाल मोहने (९३.६० % ), इंशा शकील कुरेशी (९१.८०%) तथा तृतीय माधवी किसना पाटील (९०.६० % ) आहे. रामजी महाजन देशमुख नगर परीषद शाळेतील प्रथम क्रमांक श्रेयश चिंधुजी मानकर (७४.८० % ) द्वितीय रोहीनी तुळशीराम मसराम (७२.४० % ), तृतीय फिजा तसलीम शेख (६९.६०%) आहे. स्व.इंदिरा गांधी विद्यालय, नगरधन शाळेचा एकूण निकाल ९५.८७% लागला असून प्रथम क्रमांक समीक्षा रामकृष्ण दमाहे ( ८७.४०%) द्वितीय क्रमांक अस्मिता रामु देशमुख ( ८५%) तृतीय क्रमांक सुप्रीया रामेश्वर मेंघरे ( ८४.८०%)ने पटकाविला आहे. जयसेवा आदर्श हायस्कुल पवनी येथील प्रथम क्रमांक त्रिशा श्रावण बोरकर (९०.८० % ), द्वितीय ज्योती दयाराम अवथरे (८८.४०%) तृतीय मुस्कान सुरेश ठाकुर (८५.२० % ) आहे. गुणवत्तेत आलेल्या तसेच विद्यालयातुन पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंताचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक मंडळी ,पालकमंडळी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

NewsToday24x7

Next Post

वाहतूक नियमांचे पालन करणा-यांना ‘ट्रॅफिक रिवॉर्ड्स’

Sat Jun 3 , 2023
– ३५ कोटींची बक्षीसे होणार वितरीत : ना. गडकरींच्या हस्ते अभिनव प्रकल्पाचे लोकार्पण शनिवारी नागपूर :- ट्रॅफिक सिग्नलचे पालन करणा-या नागरिकांना बक्षीस मिळवून देणा-या ‘ट्रॅफिक रिवॉर्ड्स’ या अभिनव पथदर्शी प्रकल्पाचे शनिवार ३ जून २०२३ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे सायंकाळी ७ वाजता हा समारंभ पार पडेल. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com