संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भानेगाव डब्लू सी एल अंतर्गत येणाऱ्या बिना मार्गाने अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहतूकदारावर दंडात्मक कारवाही करून त्यांच्यावर कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दोन ट्रक जप्त करून त्यातील 77.36 ब्रास वाळू जप्त करून दोन्ही वाहनचालक ,मालक विरुद्ध महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 48,(7)नुसार कारवाही करीत दोघांवर एकूण 8 लक्ष 39 हजार 464 रुपयाचा महसूल दंड ठोठावला.
प्राप्त माहितीनुसार कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या बिना मार्गे ट्रक क्र एम एच 40 सी डी 6300 चा चालक भुवनेश्वर कराडकर रा बिना संगम ट्रक मध्ये 71.36 ब्रास वाळू तर कोराडी रहीवासी संजय रघुवंशी ट्रक क्र एम एच 40 सी डी 5903 ने अवैधरित्या सहा ब्रास वाळू वाहून नेत असता महसूल अधिकाऱ्यांनी सदर वाहनावर यशस्वीरीत्या धाड घालून हे दोन्ही ट्रक खापरखेडा पोलीस स्टेशन ला जप्त करीत ट्रक मालक अमोल मालवे रा पाटणसावंगी,सावनेर व संजय रघुवंशी विरुद्ध कायदेशीर कारवाही करीत अनुक्रमे 7 लक्ष 74 हजार 364 व 65 हजार 100 रुपये असा एकूण 8 लक्ष 39 हजार 464 रुपयांचा महसूल दंड ठोठावला.