नवी दिल्ली :-मोदी सरकार शपथ घेतल्यानंतरच अॅक्सनमोड आले आहे. नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज, सोमवारी सायंकाळी ५ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणार आहे. शपथविधी समारंभ पूर्ण झाल्यानंतर, पीएम मोदींनी X वर पोस्ट केले आहे. त्यात म्हटले आहे की, मी आणि मंत्रिमंडळातील सहकारी देशाला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्र घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात 72 जणांचा समावेश करण्यात आला. त्यात 30 कॅबिनेट मंत्री आहेत. मोदी 3.0 च्या पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक आज संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. आता शपथविधीनंतर खातेवाटपाकडे लक्ष लागले आहे. खातेवाटप आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे, मुंबईत मान्सून चांगलाच स्थिरावला आहे. मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरु आहे. आज आणि उद्या पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. टी 20 विश्वचषकात पाकिस्तानवर भारताने विजय मिळवल्यानंतर त्याचा जल्लोष देशांत सुरु आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.