आता गावचा विकास करण्यास होईल सोयीस्कर सरपंच संदीप सावरकर ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून
रस्ता व नाली बांधकाम होणार सुरू…
रामटेक :- मानापुर ग्रामपंचायत अंतर्गत मौजा भोजापुर येथे सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन रोडवर झालेले अतिक्रमण करून रहदारीस अडचण निर्माण केलेल्या घरांवर ग्रामपंचायत व तहसीलदार रामटेक यांच्या संयुक्त कारवाईमुळे रस्ता चौडिकरन करण्यात आले….
यावेळी ग्रामपंचायत मानापुर तर्फे सदर कारवाई साठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून यावेळी सरपंच संदीप सावरकर , उपसरपंच भारत अडकणे सचिव निवृत्ती नेवारे, तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रमोद जांभुळे, रामटेक पोलिस स्टेशनचे अधिकारी व ग्रा पं सदस्य राहुल वांढरे,आकाश चांदेकर, पूजा वाहने,भारती आष्टनकर,सपना हटवार व सर्व गावकरी उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता व नालीचे बांधकाम सुरू होणार असून जाण्या येण्याकरिता हा रस्ता सुलभ होणार आहे त्यामुळे गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे……
सरपंच संदीप सावरकर यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की गेल्या १० वर्षापासून या गावातील नागरिकांच्या तक्रारी येत होत्या , सदर विषय हा प्रशासनाकडे पाठवनिण्यात आला होता. ही कारवाई केल्या मुळे आता गावकऱ्यांना ये जा करण्यासाठी सोईस्कर होईल. सिमेंट रस्ता बनेल , गावाचा विकास होईल. तक्रारची दखल घेत प्रशासनाने केली भोजापुर येथे अतिक्रमनाची कारवाई केली असून . गट ग्राम पंचायत माणापुर यांनी भोजापुर येथील रोडवरील अतिक्रमण कारवाई करून रस्ता रुंदी केल्यामुळे वहोणारे अपघात थांबतील. तसेच जाण्या येण्याकरीता मोठी वाहने काढण्या करीता होणारे त्रास संपुष्टात येईल… गावाचा विकास होण्याकरिता रस्ता मोठा होणे गरजेचे आहे.असे ॲड. जयश्री मेंघरे यांनी सांगितले..