अशोक कविटकर यांना २०२४ चा स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार

नागपूर :- मानवाच्या जीवनात वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनांच्या संरक्षणासाठी नागरिकांच्या सोबतच अधिकारी व कर्मचारी बांधवांची महत्त्वाची भूमिका असते. स्व. उत्तमराव पाटील प्रधान मुख्य वन संरक्षक आणि वनविभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी होते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला दरवर्षी वनराई फाऊंडेशन, नागपूर व महाराष्ट्र राज्य वनसंरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने यांना रोख रु.२१,०००/- (एकवीस हजार रुपये) सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे स्वरूप असलेला “स्वउत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

२०२४ च्या “स्व उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कारासाठी अमरावती येथील सहाय्यक वनसंरक्षक (निवृत्त) अशोक कविटकर यांची निवड करण्यात आली आहे.

अशोक कविटकर १९८८ मये वनक्षेत्रपाल म्हणून रुजू झाले, २०२० साली सहाय्यक वनसंरक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. राज्यामध्ये २०१२ साली पहिले निसर्ग पर्यटन केंद्र कारंजा लाड जि-वाशिम येथे निर्मिती केली व त्यानंतर सन २०१४ मध्ये अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे दुसरे निसर्ग पर्यटन केंद्र निर्माण केले. अमरावती येथे ऑक्सिजन पार्कची निर्मिती, वनअधिकाऱ्यांकरिता उपयोगी पुस्तक प्रकाशित केले. तसेच गरजू विद्याथ्यांना लोकसहभागातून १०० सायकलचे वाटप व शालेय साहित्याचे वाटप असे सामाजिक उपक्रमही राबविले आहेत.

आतापर्यंत सर्वश्री रमेश मारूळकर, विजय पिंजरकर, महेश तिवारी, मारुती चितमपल्ली, संयुक्त वनव्यवस्थापन समिती-निमजी, संस्था, सुरेश एच रहांगडाले, किशोर रिठे, मनोहर सप्रे, सैय्यद सलीम अहमद, रात्री चव्हाण, प्रा. सुरेश चोपणे इ. मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दि. २१ मार्च, २०२४ रोजी स्व, उत्तमराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रदान करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वीप” कार्यक्रमांतर्गत मनपा मुख्यालयात महिलांनी घेतली मतदार जनजागृती प्रतिज्ञा

Mon Mar 18 , 2024
नागपूर :- सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिका मुख्यालय येथे मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात सोमवारी (ता.१८) शेकडोंच्या संख्येत महिलांनी ‘मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमात मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, महेश धामेचा, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, शिक्षणाधिकारी साधना सयाम, स.प्र.वि.चे सहायक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com