संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 09 – निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचना आराखडा कार्यक्रम नुसार आज 9 जून ला कामठी नगर परिषद चा अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून नगर परिषद प्रशासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण 47 आक्षेप करण्यात आले होते या आक्षेपाची 23 मे पर्यंत जिल्हाधिकारी च्या कार्यालयात झालेल्या सुनावणी नुसार आज झालेल्या अंतिम प्रभाग रचना आराखड्यात काही प्रभागात बदल दिसून आला . बदल झालेल्या प्रभागामध्ये प्रभाग क्र 1, प्रभाग क्र 2 , प्रभाग क्र 6, प्रभाग क्र 10 ,प्रभाग क्र 12, प्रभाग क्र 13, प्रभाग क्र 14 चा समावेश असून या प्रभागात शक्यतो बदल करण्यात आल्याने आक्षेपकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हाधिकारी ने मंजूर केलेल्यानुसार आज 9 जून ला कामठी नगर परिषद येथे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली असून या अंतिम प्रभाग रचनेनुसार कामठी नगर परिषद च्या आगामी निवडणुकीत शहरात 1 प्रभाग वाढलेला असून 2 नगरसेवकांची वाढ होणार आहे. यानुसार 17 प्रभाग व 34 वार्ड राहणार आहेत तसेच कामठी नगर परिषद ची एकूण लोकसंख्या 86 हजार 793 असून अनु जाती ची लोकसंख्या 24 हजार 352 तर अनु जनजाती ची लोकसंख्या 1961 आहे .तर इतर उर्वरित आहेत . प्रभाग रचना नेमकी कशी असेल ,नवीन कोणता भाग वाढला असेल याची उत्सुकता आज जाहीर झालेल्या अंतिम प्रभाग रचनेतून संपली असून निवडणुका काही महिने उशिरा जरी होणार असल्या तरी इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढणाऱ्या सीमांकन क्षेत्राचा पूर्ण अनुभव आला आहे तर आतापासून मतदारांना खुश ठेवण्याची जवाबदारी सुरू झाल्याची चर्चा आहे.तर आज प्रभाग रचना प्रसिद्ध होताच इच्छुक नागरिकांची एकच गर्दी उसळली होती .तर आता प्रभाग रचना आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कामठी नगर परिषदची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com