440 मावळ्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा शिव राज्य प्रतिष्ठान, लायंस क्लब कामठी सेंट्रल, श्री गणपतराव वस्ताद का अखाड़ा कामठी व लायंस फ़िजिकल अकैडमी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात महाराजांची आरती, चित्रकला स्पर्धा, पारंपारिक अखाड़ा आणि विदर्भ स्तरीय भव्य रक्तसमर्पण रक्तदान शिबीर घेन्यात आले आणि या रक्तसमर्पण मध्ये ४४० शिवमावळयाँनी रक्तदान केले . या शिबीर मध्ये AIIMS (एम्स) हॉस्पिटल रक्तपेढी, सुपर मेडिकल रक्तपेढी व लाइफलाइन रक्तपेढी यांचा समावेश होता.

शिवजन्मोत्सव सोहळयात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्रीमंत डॉ. राजे मुधोजीं भोंसले महाराज व युवराज जयसिंह राजे भोंसले, प्रमुख अतिथि रामटेक लोकसभेचे खासदार कृपाल तुमाने, कामठी मौदा विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर , माज़ी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे, माज़ी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर, लायंस डिस्ट्रिक्ट गवर्नर श्रवण कुमार, उदयसिंहजी उर्फ़ गज्जूभैया यादव, अनिल निधान, अजय अग्रवाल, अजय कदम, मुख्याधिकारी न. प. कामठी संदीप बोरकर, पोलिस निरीक्षक जूनी कामठी दीपक भिताड़े, रनाळा सरपंच पंकज साबळे, गादा सरपंच सचिन डांगे, राधेश्याम हटवार, काशीनाथ प्रधान, जयराज नायडू, संजय कनोजिया उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिव राज्य प्रतिष्ठान चे व लायंस क्लब चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते

शिव राज्य प्रतिष्ठान ने गरजूंना निःशुल्क रक्त देन्याची ज़बाबदारी घेतली आहें.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मागील तीन महिन्यापासून थकले शिवभोजन केंद्राचे अनुदान

Mon Feb 20 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मागील तीन महिन्यापासून कामठी तालुक्यातील शिवभोजन केंद्र चालकांचे अनुदान थकले आहे त्यामुळे शिवभोजन केंद्र चालवावे कसे?असा प्रश्न शिवभोजन केंद्र चालकाकडून उपस्थित केला जात आहे. शिवभोजन केंद्राचे अनुदान थकल्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला,किराणा,खाद्य तेलासह अन्य साहित्य विकत कसे घ्यायचे?अनेक किराणा दुकानदारांचे मागील तीन महिण्यासपासून बिल थकले आहे त्यामुळे किराणा दुकानदारही शिवभोजन केंद्र चालकांना उधारी देत नाही शिवाय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com