अरोली :- खात – रेवराल जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या घोटमुंढरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तीळसंक्रात निमित्ताने बाल उत्सव मंडळ यांच्या सौजन्याने दोन दिवसीय मंडईची सुरुवात उद्या दिनांक 13 जानेवारी सोमवारपासून होणार आहे.
सोमवारला सकाळी अकरा ते रात्री आठ पर्यंत भंडारा जिल्ह्यातील न्यूतर्रा मंडळ नवेगाव येथील शाहीर गणेश मेश्राम यांच्या राष्ट्रीय संगीत खडा तमाशा, रात्री आठ वाजता चेतन बेले यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम. 14 जानेवारी मंगळवार ला सकाळी 11 ते 7 वाजेपर्यंत परसोडी येथील शाहीर सुभाष भाऊ यांच्या संपूर्ण पार्टी सहित गोंधळाच्या कार्यक्रम, रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत लष्करा गोड लावणी डान्स ग्रुप, नागपूर यांच्या लावणीच्या कार्यक्रम, असे सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम मंडईनिमित्त आयोजित केलेले आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र शासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,अध्यक्ष राज्यमंत्री आशिष जयस्वाल, प्रमुख अतिथी माजी आमदार टेकचंद सावरकर ,जि प सदस्य राधाताई मुकेश अग्रवाल ,पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर, पंचायत समिती सदस्य दुर्गा ताई जामुवंत ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल, माजी सरपंच कैलास वैद्य, माजी उपसरपंच गोरखनाथ मडावी, तंटामुक्त अध्यक्ष धनसिंग पटले ,सरपंचा चंदाताई वसंता गेडाम, उपसरपंच शाम वाडीभस्मे, ग्रामपंचायत सदस्यगण विलास पटले ,शंकर पटले, पूजा पिंटेश पटले ,मोसमी अनुप घरडे, संगातील मनोज चामट, अरविंद भोयर, ज्योत्स्ना संजय पटले ,अपूर्वा पडोळे सह गावातील व परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक धनसिंग पटले, छगन श्रावणकर ,अरविंद श्रावणकर, नीलकंठ भोयर, जितेंद्र श्रावणकर, कवीश श्रावणकर, दिनेश पटले, अरविंद पटले, भूपेंद्र पटले, विनोद येटीकुंभरे ,लक्ष्मण साकोरे, कुणाल क्षीरसागर, नरेंद्र बारई ,राजू देवतारे, गजानन श्रावणकर ,राहुल बालपांडे ,संजय मदनकर, ज्ञानेश्वर मते, वसंता गेडाम, अर्जुन घरडे ,रघुपती चिंचुरकर, नाथा भलाई ,कैलास ठवकर ,राजकुमार मेंढे ,राजकुमार रावते, आनंदराव वंजारी, गिरधर उईके, देविदास खरोले ,जीवन खोडके,बंडू हिवरकर, योगेश उईके ,परसराम सतीकोसरे ,उदय पांडे ,योगेश खरोले सह आयोजक मंडळाचे समस्त पदाधिकारी व सदस्य गण समस्त घोटमुंढरीवासियांनी केले आहे व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्यगण व समस्त घोटमुंढरी ग्रामवासी सहकार्य करताना दिसत आहे.