नागपूर – स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कारवाई नागपूर ग्रामीण हद्दीत दरोडयाच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार केले. पोलीस स्टेशन कन्हान नागपूर ग्रामीण अंतर्गत पोस्टे कन्हान येथे 1) अप क्र. कलम 395, 427 भादवी सहकलम 3,4/25 भा.ह.का. सह.क. 135 मुपोका. अन्वये गुन्हा नोंद होता. तसेच दिनांक 03/02/2023 रोजी पोस्टे कन्हान येथे 2) अप क्र. 53/2023 कलम 143, 147, 149, 294, 506 भादवि सहकलम 3,4/25 भा.ह.का. सहकलम 135 मु.पो.काव पोलीस स्टेशन कन्हान येथील 3) अप 54/23 कलम 395, 427 भांदवि सहकलम , 4/25 भा.ह. का. अन्वये गुन्हा नोंद होता. अशा विविध गुन्हयातील फरार आरोपीचां शोध घेणेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले. सदर गुन्हयातील समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 31/03/2023 रोजी रात्री दरम्यान पोलीस स्टेशन कन्हान येथील अप 54/23 कलम 395, 427 भांदवि सहकलम , 4/25 भा.ह. का. या सर्व गुन्हयातील मुख्य आरोपी नामे-खैलेश पंचम सलामे, वय 30 वर्ष 2)शुभम उर्फ निखील पंचम सलामे, वय 30 वर्ष दोन्ही रा. शिवाजी नगर कन्हान हे नमुद घटने तारखेपासुन सतत फरार असुन ते सध्या वानाडोंगरी हिंगणा नागपूर येथे नातेवाईकांकडे राहत असल्याचे गोपनीय खबरेवरून नमुद नातेवाईकाकडे स्टाफसह शोध घेतला असता नमुद दोन्ही आरेापी हे त्याच्या नातेवाईकांच्या घरी हजर मिळाले. त्यांना ताब्यात घेवुन सदर गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायेदेशिर कार्यवाही करीता पोस्टे कन्हान यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, अनिल राऊत, आशिष ठाकुर, पोलीस हवालदार विनोद काळे, गजेंद्र चौधरी, इकबाल शेख, मिलींद नांदुरकर, नरेंद्र पटले, रोशन काळे, पोलीस नायक अमृत किनगे, स्वाती हिंडोरीया, सतिश राठोड यांचे पथकाने केली.