भंडारा : केंद्र पुरस्कृत “आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME)” ही योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षासाठी लागू केली आहे. या योजनेमध्ये कृषि उत्पादने, दुग्ध व पशुउत्पादने, मांसउत्पादने, वन उत्पादने इत्यादीवर प्रक्रिया करणे व यांवर आधारित उत्पादने याचा समावेश आहे. वाया जाणाऱ्या कच्च्या शेतमालाचे प्रमाण कमी करणे, उत्पादनाची योग्य पारख करणे, उत्पादनाची साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग, मार्केटिंग व ब्रॅडींग यासाठी या योजनेतून सहाय्य देण्यात येत आहे.
नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण /स्तरवृद्धीसाठी भांडवली गुंतवणूकीसाठी बॅंक कर्जाशी निगडीत अर्थ सहाय्य करणे आणि FSSAI अंतर्गत स्वच्छता मानके नोंदणी, उद्योग आधार आणि वस्तू व या योजनेमध्ये वैयक्तीक मालकी/ भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयं सहायता गट (SHG), अशासकीय संस्था (NGO), सहकारी संस्था (Cooperative), खाजगी कंपनी (Pvt. Ltd. Companies) यांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लक्ष अर्थ सहाय्य देण्यात येत असून ही योजना बॅंक कर्जाशी निगडीत आहे.
नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण /स्तरवृद्धीसाठी कौशल्य प्रशिक्षण, अन्न सुरक्षे बाबतचे तांत्रिक ज्ञान देणे, उत्पादनाची गुणवत्ता व दर्जा यामध्ये सुधारणा करुन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांची क्षमता बांधणी करणे याचाही समावेश आहे. जिल्हास्तरावर अर्जदारांना सहाय्य करणेसाठी जिल्हा संसाधन व्यक्तींची (DRPS) नेमणूक करण्यात आली आहे. या DRP’s मार्फत अर्जदारांचे आवश्यक कागदपत्रे बँकेपर्यंत कर्ज मंजूरीस्तव सादर करणे, कर्ज वितरणासाठी पाठपुरावा करणे, FSSAI, GST आणि उद्योग आधार प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी अर्जदाराला मदत करणे. इत्यादी कामात DRPS लाभधारकास मदत करतात. जिल्हा संसाधन व्यक्तींची (DRPS) म्हणून कुठल्याही शाखेत पदवीधर असलेले व्यक्ती बँक मित्र, बँकेचे निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, CA तसेच ज्यांना अन्न प्रक्रिया उद्योगात काम करण्याचा अनुभव आहे अश्या व्यक्तींची जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने नेमणूक करण्यात येते. हे काम करण्यास इस्चुक व्याक्तींनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी या कार्यालयांशी संपर्क साधावा.
PMFME योजनेत सहभागी होण्यासाठी वैयक्तिक व गट लाभार्थ्यांनी भांडवली गुंतवणूक प्रस्तावांसाठी www.pmfme.mofpi.gov.in या संकेत स्थळावर अर्ज सादर करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी. तसेच संबंधित तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी या कार्यालयांशी संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.
@फाईल फोटो