दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार, दि. 24, मंगळवार दि.25 व बुधवार, दि. 26 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

साहित्य रसिकांना, साहित्याच्या विविध प्रकारांबद्दल, कविता, वाचनसंस्कृती व दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा, त्याचप्रमाणे बालगोपाळांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी बालदिवाळी अंकांची भूमिका, काव्यप्रकार तसेच नवीन साहित्यिक व त्यांचे साहित्य आणि वाचकांची बदलती भूमिका याबाबत ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमातून दिवाळीच्या उत्साही वातावरणात ऐकायला मिळणार आहे. ज्येष्ट निवेदक स्नेहा आघारकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com