विभागीय सरस प्रदर्शनीला सर्वानी भेट देवून महिलांना प्रोत्साहन द्यावे- राजेंद्र एम.भुयार

गडचिरोली :- विभागीय सरस प्रदर्शनीसाठी नागपुर विभागातील नागपुर, चंद्रपुर, गडचिरोली, गोदिंया भंडारा, वर्धा या जिल्हयातील 180 स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे व पदार्थाचे विक्री व प्रदर्शनीमध्ये ग्रामिण भागातील अस्सल गावरान पध्दतीच्या विविध पदार्थाची चव चाखयला मिळत आहे. या शिवाय लाकडी वस्तु, दागीने, ड्रेस मटेरिअल, घरगुती मसाले, गावरान दाळी, कुरडया, पापडया, आंबा लोनचे, मच्छी लोनचे, व्हेज नॉव्हेज जेवणाची दुकाने उभारण्यात आलेली आहे. भजी- भाकरी, पुरणपोळी, ज्वारी भाकरी, भरीत-भाकरी, चिकन भाकरी, इडली, अप्पे, साबुदाना वडे, मोहाचे विविध पदार्थ असे अनेक भोजन व नास्त्याचे स्टॉल थाटात उभे असून बुधवारी प्रदर्शनीला प्रारंभ झाला आहे. दोन दिवसात जवळपास 8.50 लक्षची उलाढाल झाली आहे.

कृषी महाविद्यालय गडचिरोलीचे प्रांगणात आयोजित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान गडचिरोली अंतर्गत विभागस्तरीय व जिल्हास्तरीय सरस विक्री व प्रदर्शनी दि. 29 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे.

दररोज रात्री 7 वाजता सांस्कृतीक मेजवाणी यामध्ये लोक संगीत, विविध शालेय विद्यार्थ्यांचे डान्स, आदिवासी संस्कृती दर्शन कार्यक्रम, अधिकारी कर्मचाऱ्यांचे डान्स असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येत आहे. दोन दिवसात जवळपास 8.50 लक्षची विक्रमी उलाढाल झाली आहे.

वस्तुंची खरेदी करुन महिलांना प्रोत्साहन द्यावे – राजेंद्र एम. भुयार, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गडचिरोली.

ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी विभागीय सरस महोत्सव प्रदर्शन व विक्रीसाठी दिनांक 29 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वानी भेट देवून महिलांना प्रोत्साहन द्यावे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Central Railway: QR Code and UTS App Facilities for Ticket and Parcel Booking

Sat Feb 1 , 2025
Nagpur :-Central Railway is committed to providing the best services to passengers and customers by embracing new technologies and driving digital transformation. Under the leadership of Divisional Railway Manager Vinayak Garg, Nagpur Division has introduced innovative services such as QR code-based payments and the UTS mobile app, making ticket and parcel booking more seamless and convenient. *QR Code-Based Payment for […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!