जवान अक्षय भिलकर यांचेवर रामटेक येथे अंत्यसंस्कार

नागपूर :- 14-मराठा लाईट इन्फेन्ट्री बटालियनचे जवान अक्षय अशोक भिलकर यांचेवर आज शासकीय मानसन्मानाने रामटेक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मराठा रेजिमेंट सेंटरवर कार्यरत असतांना 26 वर्षीय अक्षय भिलकर हे 12 नोव्हेंबर रोजी फिजीकल कॅज्युअल्टीमुळे मयत झाले होते. त्यांचे पार्थीव आज विमानाने नागपूर येथे आणण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या पार्थीवावर पुष्पचक्र वाहून शांतीवंदना दिली.

त्यांचे अंतिम संस्कार त्यांच्या मूळ गावी रामटेक येथील अंबाळा घाटवर करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे नातेवाईकांसह, माजी सैनिक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

१० टक्के व्हॅटमुळे मोडले परमिटधारकांचे कंबरडे ?

Wed Nov 15 , 2023
– शासनाने १० % टक्के व्हॅट डबल केल्यामुळे परमिटधारक रस्त्यावर उतरणार ! – येत्या 16 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा – नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन द्वारा जिल्ह्यातील रेस्टॉरंट परमिटरूम येत्या 16 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय – राजीव जयस्वाल नागपूर :- जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन यांच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील रेस्टॉरंट परमिटरूम गुरुवार दि. 16 नोव्हेंबर 2023 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com