लिपिकसंवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी ०२ ऑक्टोबर २०२२ ला सत्याग्रह आंदोलन.

संविधान चौक नागपूर येथे 12 ते 3 या वेळेत आंदोलन करणार 

नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील एकुण १३ लाख लिपीकांचे समान काम, समान वेतन आणी समान पदांचे टप्पे यासाठी महाराष्ट्रातील लिपीकांनी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक वर्गीय हक्क परिषदेमार्फत वेळोवेळी आंदोलन करण्यात आली. शासन स्तरावर निवेदने दिली, आढावा बैठका झाल्यात. तत्कालीन राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे पुढाकाराने लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांचे समान काम समान वेतन आणी समान पदोन्नती टप्पे यासाठी शासन परिपत्रक दि.०७.०७.२०२१ नुसार समिती गठीत करण्यात आलेली होती. समितीने सामान्य प्रशासन विभागात तसा अहवाल दिला व त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने वरील शासनाचे २३.०५.२०२२ चे परिपत्रकान्वये सर्व विभागातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागास दिनांक ३१.०८.२०२२ अखेर तसे प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेशीत केले आहे. परंतु त्याप्रमाणे आज अखेर कार्यवाही झाली नाही.

या तसेच नविन पेन्शन योजना रदद करुन सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना १९८२ ची लागू करणे, समान काम, समान वेतन व समान पदनाम, पदोन्नतीचे टप्पे व समान अधीकार, सर्व कर्मचाऱ्यांना सुधारीत आश्वासित प्रगती योजनेतील १०, २० व ३० चा लाभ लागू करणे. (उदा.शीक्षकेतर कर्मचारी /आश्रमशाळा / महाराष्ट्र जिवन प्राधीकरण ) लिपीक संवर्गाची पदे कंत्राटी निर्माण न करता ती स्थायी स्वरुपाची निर्माण करुन रिक्त पदे तात्काळ भरावी. पदोन्नती धारकास वरिष्ठ पदाचे किमान मुळ वेतनासाठी दि. २२.०४.२००९ च्या अधिसुचनेत सुधारणा करणे . लिपीकांच्या अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकण्यात यावी. कॅशलेस वैद्यकीय सुविधा व लिपीकांचे नियमित प्रशीक्षण देण्यात यावे. इत्यादी लिपीक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी सत्याग्रह आंदोलन महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात करण्यात येत आहे. तसेच नागपूर शहरातील संविधान चौक येथे 2 ऑक्टोबर रोजी 12 ते 3 यादरम्यान आंदोलन आंदोलन करणार असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

General Anil Chauhan takes over as Chief of Defence Staff..

Sat Oct 1 , 2022
Vows to fulfil the hopes of the Nation & deal with challenges together Delhi – General Anil Chauhan, PVSM, UYSM, AVSM, SM, VSM assumed office as the Chief of Defence Staff (CDS) on September 30, 2022. General Chauhan will also be the Principal Military Advisor to the Raksha Mantri on all Tri-Service matters as well as head Department of Military […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights