कामठी तालुक्यात दोन ठिकाणी सुमन केंद्राची स्थापना

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-सुरक्षित मातृत्व आश्वासन केंद्रात प्रसूती अन लसीकरणाची सुविधा

कामठी :-गर्भधारणा उपचारासह प्रसूती,प्रसुतीपश्चात उपचार,बालकाचे लसीकरण एकाच छताखाली व्हावे या अनुषंगाने कामठी तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा या दोन ठिकाणी सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन)केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

1मे पासून हे केंद्र कार्यान्वित झाल्याने आता शहर आणि ग्रामीण भागातच गर्भावस्थेतील उपचारासह प्रसूती आणि प्रसूती दरम्यान उपचार व बालकांचे लसीकरण शक्य झाले आहे. त्यामुळे आता एकाच छताखाली गर्भवती महिलांना उपचार व आरोग्य संबंधित विविध समस्यांवर सल्ला मिळणार आहे.या सुमन केंद्रावर गर्भवतींची प्रसूती व प्रसूतिदरम्यान उपचार मोफत पुरवण्यावर भर देण्यात येणार आहे .प्रसूती नंतर सहा महिन्यापर्यंत माता आणि बाळाला सर्वांगीण सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करतील ज्यामुळे निरोगी गर्भधारणा होईल व मातांमृत्यु व बालमृत्यूचेही प्रमाण कमी होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंढरपूर यात्रेनिमित्त आषाढीवारी मार्गावरील खासगी दवाखाने सुरु ठेवावे - आरोग्यमंत्री डॉ. प्रा.तानाजी सावंत

Mon Jun 19 , 2023
मुंबई :- पंढरपूर वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज असून, या वर्षी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वारी दरम्यान आपले दवाखानेही सुरु ठेवावे, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य सुविधेबाबत नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत केले. वारीच्या कालावधीत पंढरपूर परिसरातील व वारी मार्गावरील काही खासगी वैद्यकीय व्यावसायिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com