निसर्गोपचारामुळे स्वस्थता व दिर्घायुष्य मिळते – डॉ. वैभव मस्के

अमरावती :- निसर्गोपचार ही दुष्परिणामविरहीत अशी चिकित्सा पध्दत आहे. कोरोना काळात याचा अधिक प्रत्यय आला. बदलत्या जीवनशैलीत ही चिकित्सा पध्दत आणखी रूजत चालली आहे व विद्याथ्र्यांना या चिकित्सा पध्दतीचे सखोल ज्ञान मिळावे, जेणेकरुन समाजाला त्याचा लाभ मिळू शकेल, अशा आशयाचे प्रतिपादन डॉ. वैभव मस्के यांनी केले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने आयोजित अतिथी व्याख्यान देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील होते.

अध्यक्षीय भाषणातून डॉ. श्रीकांत पाटील यांनी निसर्गोपचाराबद्दल विद्याथ्र्यांना माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रजल्वनाने करण्यात आली. अतिथींचा परिचय प्रा. आदित्य पुंड यांनी करुन दिला. पाहुण्यांचे स्वागत डॉ. अनी राऊत यांनी केले. सूत्रसंचालन अनिरुध्द राऊत, तर आभार प्रयोग निस्ताने यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. राधिका खडके, प्रा. राहुल दोडके, प्रा. संदीप महल्ले, प्रा. मनिष धुळे, डॉ. अनघा देशमुख यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com