लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख जाहीर,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई :- पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. भाजपा – शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे , असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘’महाविजय अभियान २४’’ चे प्रदेश संयोजक आ. श्रीकांत भारतीय, महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.             बावनकुळे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजपा बरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत. आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने आमचे निवडणूक प्रमुख शिवसेनेसाठीही काम करणार आहेत.

मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे सध्या सुरु असलेल्या महाजनसंपर्क अभियानात नांदेड येथे १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे. या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानात घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ३ कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. याच अभियानात टिफिन बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नागपूर येथे व आपण अक्कलकोट येथे टिफिन बैठकीला उपस्थित होतो, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

Vidhansabha Pramukh 2024 List

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आ. राहुल कुल, पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ, मुंबई उत्तर साठी आ. योगेश सागर, मावळ साठी आ. प्रशांत ठाकूर आदींची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी येथे मोठ्या उत्साहात हिन्दू साम्राज्य दिन संपन्न

Thu Jun 8 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा म्हणजेच हिन्दू साम्राज्य दिन कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले .याप्रसंगी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंधेला कामठी नगरातील अनेक वस्ती – वस्ती परीसरात ३५० दिव्यांची रोशनाई करून महाराजांचे विधिवत पुजन करण्यात आले. तर वर्षेभरात ३५० रोपांच्या लागवडीचा संकल्प घेऊन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com