परीश्रमातून फुलली नैसर्गिक शेती

नागपूर :- शेती उत्पादकतेत होणारी सतत घट, निसर्गाचा लहरिपणा, उत्पादन खर्च व उत्पादकांना शेती परवडणारी नसतांनाच समुद्रपूर तालुक्यातील खैरगाव येथील शोभा गायधने यांनी मागील 21 वर्षापासून नैसर्गिक शेती करीत आहे. त्यांच्या शेतीला भेट देऊन अनेक शेतकरी त्यांचे अनुकरण करीत आहेत.         शोभा गायधने यांनी 2002 पासून शेती करायला सुरूवात केली. रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले. त्यांच्याकडे 15 एकर शेती असून यामध्ये ते हळद, गहू, तूर, चना, लिंबू, शेवगा व भाजीपाला आदि पीके घेतात. यातून त्यांना वार्षिक 8 लाख रूपयांचा नफा होवू लागला. निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेवून “मागेल त्याला शेततळे” या योजनेअंतर्गत शोभा यांनी त्यांच्या शेतामध्ये 50 मीटरचे शेततळे तयार केले. यामुळे 24 तास पाणी उपलब्ध झाल्याने शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण झाली. रासायनिक खते आणि किटकनाशकाचा वापर कमी झाल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊ लागला. किटकनाशकांना पर्याय म्हणून दशपर्णी अर्क आणि निबोळी अर्काचा वापर करून फवारणी करताता. ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी केल्यास अधिक परिणामकारक असल्याचे शोभा यांनी सांगितले. शेतीमध्ये चवळी, टमाटर, कोहळा, मिरची आदी भाजीपाल्यांची पीके घेतात, रासायनिक खताचा वापर होत नसल्याने विषमुक्त भाजीपाला परिसरातील नागरिकांना मिळू लागला.

विषमुक्त शेतीसाठी आवश्यक असलेले कडुनिंब, करंजी, महारूख, सीताफळ, धोत्रा, रूई अर्क तयार करण्यासाठी जीवामृत व घटकांचा शेतीसाठी वापर करतात. त्यांचे मार्गदर्शन इतर शेतकरी घेत असल्यामुळे परिसरातील शेती उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होत असल्याचे शोभा गायधने यांनी सांगितले.

हळदीचे गुणधर्म ग्राहकांना पटवुन देण्यासाठी त्या आपल्या शेतामध्ये हळदीचे उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करून ग्राहकांना हळद उपलब्ध करून देतात. यामध्ये हळदीचे बेणे, कच्ची हळद, कांडी पावडर विक्रीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहे.

कृषी भूषण पुरस्कार

शोभा यांच्या नैसर्गिक शेतीची शासनाने दखल घेवून 2022 साली कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. रासायनिक खताचा वापरामुळे जमिनीचा कसदारपणा कमी होवू शकतो, यामुळे नैसर्गिक शेतीमुळे जमिनिची सुपिकता टिकून राहते आणि कमी खर्चामध्ये शेती फायदेशीर ठरते. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे मत शोभा गायधने यांनी व्यक्त केले.

NewsToday24x7

Next Post

सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी 2 रेस्टोरेंटवर प्रत्येकी ५० हजाराचा दंड 

Thu Jun 8 , 2023
– स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.७) रोजी १५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यात सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी दोन रेस्टोरेंटवर कारवाई करून प्रत्येकी ५० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com