कामठी येथे मोठ्या उत्साहात हिन्दू साम्राज्य दिन संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा म्हणजेच हिन्दू साम्राज्य दिन कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले .याप्रसंगी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंधेला कामठी नगरातील अनेक वस्ती – वस्ती परीसरात ३५० दिव्यांची रोशनाई करून महाराजांचे विधिवत पुजन करण्यात आले. तर वर्षेभरात ३५० रोपांच्या लागवडीचा संकल्प घेऊन ५ रोपांचे रोपन करण्यात आले. तर सकाळी महारांजाचे विधिवत पुजन करून महारूद्र अभिषेक करण्यात आले. तर दुपारी रक्तादान शिबीराचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या साहाय्याने घेण्यात आले ज्यात मोठ्या संख्येतील रक्तदात्याने रक्तदान केले. सायंकाळी बाईक रैली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने कामठी येथील प्रमुख मार्गने भ्रमण करून छत्रपती महाराज चौक येथे समापन करण्यात आले.

छत्रपती शिवजी महाराज यांच्या मूर्ती च्या परिसराचे संदौरिकरणाचे भूमि पूजन करण्यात आले नंतर याप्रसंगी स्वराज्य रक्षक ढोल ताशा पथकाचे वादन झाले याप्रसंगी व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी आपल्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर प्रकाश टाकले व शिवराज्याभिषेक या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कामठी नगराचे संघचालक मुकेश चकोले , भा.ज.पा कामठी शहर महामंत्री सुनील खानवानी, ग्रीनर प्रोजेक्टचे संचालक सचिन नायडू, युवा चेतना मंच नागपूर ग्रा. अध्यक्ष प्रा. पराग सपाटे प्रामुख्याने उपस्थित होते.रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . हे आयोजन शिवराज्याभिषेक सोहळा समीती कामठी ,सहयोगी संस्था

शिव नित्य पुजन समिती , हिंदू जागरण मंच , युवा चेतना मंच , विश्व हिन्दू परिषद , श्वास जनकल्याण बहुद्देश्यीय संस्था,युवा मंडल छत्रपती नगर,स्वराज्य रक्षक ढोल ताशा पथक येरखेड़ा  अखिल भारतीय विद्यार्थी परीषद यांनी केले. आयोजनाकरीता अनिल गंडाईट , सोनू नेवारे ,बंटी पिल्ले, अल्केश्वर लांजेवार, सागर बिसने, हितेष बावनकुले, महेश सावरकर,चंदन वर्णम,अनुराग शर्मा, संजय करंडे, निकेश टेकाडे कुणाल रंधई, अनिल साहू, कार्तिक सीरिया, नरेंद शिंदे, अजय कोहले, अथर्व पिंगळे, आकाश भोगे, यांनी अथक परीश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सी ॲन्ड डी वेस्ट मटेरियल व्यवस्थापनासंदर्भात दिशानिर्देश जारी, मनपाद्वारे टोल फ्री क्रमांक जारी : दंडाची देखील तरतूद

Thu Jun 8 , 2023
नागपूर :- सी ॲन्ड डी वेस्ट म्हणजेच बांधकाम व पाडकाम वेस्ट मटेरियल व्यवस्थापन नियमावली २०१६ संदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या दिशानिर्देशाची दहाही झोनमध्ये अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशामध्ये सी अँड डी कच-याकरिता टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आलेला आहे. हा कचरा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com